Home Latest News Ag Inviro कंपनीचा, काम चलाऊ कारभार !

Ag Inviro कंपनीचा, काम चलाऊ कारभार !

0
33

– Ag Inviro कंपनी च्या कचऱ्याच्या गाड्या नियमित नाही आल्या तर NMC च्या कार्यालयात कचरा टाकू ? अन्यथा आंदोलन करू – विशाल कोरके

नागपूर :- प्रभाग २९ नवीन म्हाळगी नगर या भागात 3 ते 4 दिवस कचऱ्याच्या गाड्याचं येत नाहीत. मागील 20 दिवसात फक्त 6 ते 7 दिवसच गाडी आली होती. जर तक्रार केल्यास कधी गाडी खराब आहे तर कधी ड्रायवर सुट्टीवर आहे असेच प्रकारचे उत्तर मिळतात. एन दिवाळीतही कचरा गाडी न आल्याने नागरिकांच्या घरातच कचरा साठवून होता. त्यानंतर 6 ते 7 दिवस गाडी आली व नंतर पुन्हा गाडी खराब झाल्याचे कारणे समोर आली. नवीन म्हाळगी नगरात 275 स्केअर फिटचे 1000 ते 1100 घरे असून 2000 च्यावर लोकवस्ती आहे. कचरा साठवून ठेवणे अडचणीचे जाते. सतत कचरा साठवल्याने दुर्गंधी व मच्छराचे प्रमाण वाढते. त्यामुळे लहान मुलं व ज्येष्ठ नागरिकांची प्रकृती वारंवार खराब होते. 365 दिवसातून 165 दिवस, यांचे प्रॉब्ल्मच असतात.

मागील अनेक वर्षांपासून कचरा गाडीची समस्या आहेच : यावर कुठल्याही प्रकारचा तोडगा काढला नसून गाडी खराब असताना दुसरी गाडी पाठवल्या जात नाही.

AG INVIRO कंपनी व NMC अधिकाऱ्यांना फोन केल्यावरही सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याने नेहमी कचरा गाडीची समस्या असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तोडगा न निघाल्यास शिवसेनेच्या तर्फे आंदोलन करून कार्यालयातच कचरा टाकण्यात येईल. असा इशारा नागरिंकानी व समाजसेवी विशाल कोरके यांनी दिलेला आहे. म्हाळगी नगर बरोबरच शिवाजी सोसायटी, प्रेरणा नगर, विनायक नगर या भागातही हीच समस्या आहे.