Home Latest News रोजंदारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न लवकरच निघणार निकाली

रोजंदारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न लवकरच निघणार निकाली

0
46

– प्रकल्प अधिकारी यांचे आश्वासन : राज्याध्यक्ष सुभाष बाळबुधे यांनी मांडल्या समस्या

यवतमाळ :- आदिवासी विकास विभागांतर्गत जिल्ह्यातील अनेक आश्रमशाळामध्ये रोजंदारी कर्मचाऱ्यांची कंत्राटी स्वरुपात नियुक्ती केली आहे. कोणताही आदेश नसतांना नियमांना बगल देत हेतुपरस्पर काही हेकेखोर मुख्याध्यापकांनी रोजंदारी कर्मचाऱ्यांना थेट कामावरून कमी केले आहे, त्याचबरोबर मागील चार महिन्यांपासून रोजंदारी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले होते. याबाबत शासनमान्य आदिवासी विकास विभाग वर्ग ४ चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना म.रा. नाशिक यांच्याकडे तक्रार प्राप्त होताच राज्याध्यक्ष सुभाष बाळबुधे यांनी सोमवारी (ता.३) थेट प्रकल्प अधिकारी कार्यालय पांढरकवडा यांचे दालन गाठले व समस्यांना वाचा फोडली. प्रकल्प अधिकारी अमितकुमार रंजन यांनी लवकरच वेतनासह रोजंदारी कर्मचाऱ्यांचे संपूर्ण प्रश्न निकाली काढु, अशी ग्वाही देखील संघटनेच्या शिष्टमंडळाला दिली.

प्रकल्प एकात्मीक आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय पांढरकवडा या कार्यालयाच्या अंतर्गत शासकीय आश्रमशाळा वसतिगृहातील वर्ग ४ कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. रोजंदारी कर्मचाऱ्यांचे मागील माहे एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीतील वेतन रखडल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीचे संकट कोसळले. दिवाळीचे दिवसात देखील घरात सर्वत्र आर्थिक टंचाईचा अंधार पसरला होता. अखेर प्रकल्प अधिकारी अमितकुमार रंजन यांची भेट घेत कर्मचाऱ्यांच्या समस्या निकाली काढल्याबाबत राज्याध्यक्षांनी टाहो फोडला. यावेळी प्रकल्प अधिकारी यांनी तीन दिवसांत सर्व समस्या निकाली काढु अशी ग्वाही दिली. यावेळी कार्यालय अधीक्षक सचिन राठोड, एपीओ उके, आदींची उपस्थिती होती.

प्रकल्प अधिकारी कार्यालयात झालेल्या सभेत वर्ग ४ कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष सुभाष बाळबुधे, रतन रामपूरे, दौलत रामपूरे, नास्वर टेकाम, श्रीराम धुर्वे, दर्शना धुर्वे, मुस्तफा रायलीवाले, मिना गोधनकर, सुनीता लोणकर, मनकर्णा मेश्राम, लक्ष्मण वाढवे, राजु लोणकर, चंद्रशेखर सायरे, घनश्याम मेश्राम, आशिष लोणबले, गणेश पवार, मंदीप पवार, रोशन मोगरे, विजय जुनघरे, राधा आत्राम आदींची उपस्थिती होती.