यवतमाळ :- पाणी पुरवठा योजना देखभाल व दुरुस्ती अंतर्गत कार्यालय परिसरातून दर्डा नगर एम.बी.आर. ला पुरवठा करणाऱ्या ६०० मि.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर गळती झाल्याने सदर गळती दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून, गळती दुरुस्त होईपर्यंत अंदाजे ३ ते ४ दिवस दर्डा नगर एम.बी.आर. सात टाक्यांमार्फत होणारा पाणीपुरवठा खंडित राहणार आहे.
या अंतर्गत प्रभावित होणाऱ्या टाक्यांमध्ये दर्डा नगर, बेले ले आऊट, वनवासी मारोती, सुयोग नगर १ व २ तसेच शिवाजी नगर १ व २ या परिसरांचा समावेश आहे.
सर्व नळधारकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जलपुरवठा विभागाने केले आहे. सदर दुरुस्ती पूर्ण होताच पाणीपुरवठा त्वरीत सुरळीत करण्यात येईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, यवतमाळ यांनी कळविले आहे.




