यवतमाळ :- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अर्ज ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत वर्ग ११ वी, १२ वी तसेच १२ वी नंतरच्या अव्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमात सन २०२५-२६ मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून लाभ घेता येणार आहे.
सदर अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी http://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख दि. ३० नोव्हेंबर अशी निश्चित करण्यात आली आहे.ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत, त्यांनी नवीन तसेच नुतनीकरण अशा दोन्ही प्रकारचे अर्ज ऑनलाईन भरून सर्व आवश्यक कागदपत्रांसह दि. ३० नोव्हेंबर पर्यंत संबंधित कार्यालयात सादर करावेत.
विहित कालावधीत अर्ज सादर न केल्यास व सदर योजनेपासून विद्यार्थी वंचित राहिल्यास संबंधित लाभार्थ्यांची जबाबदारी राहील, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मंगला मुन, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, यवतमाळ यांनी केले आहे.




