spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‘GST दिवस 2025’ निमित्त वेकोलि ला नागपूर क्षेत्रातील सर्वाधिक करदात्याचा सन्मान

 

सलग आठव्या वर्षी वेकोलिने मिळवले ‘सर्वाधिक करदाता’ पुरस्कार

नागपूर १० : वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (वेकोलि) यांना ‘GST दिवस 2025’ च्या निमित्ताने नागपूर क्षेत्रातील सर्वाधिक करदाता असल्याबद्दल विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले. हा सन्मान केंद्रीय वस्तू व सेवा कर (CGST) चे प्रधान आयुक्त अतुल रतोगी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. वेकोलिच्या वतीने हा पुरस्कार महाप्रबंधक (वित्त) बी. इंदिरा यांनी स्वीकारला. विशेष म्हणजे, सलग आठव्या वर्षी वेकोलिला नागपूर क्षेत्रातील सर्वाधिक करदाता होण्याचा मान प्राप्त झाला आहे.

या पुरस्काराचे औपचारिक रूपाने सुपूर्दगी वेकोलिचे संचालक (वित्त) बिक्रम घोष यांनी वेकोलिचे अध्यक्ष-सह-प्रबंध निदेशक जे. पी. द्विवेदी यांच्याकडे केली. या कार्यक्रमाला वेकोलिचे सर्व संचालक तसेच वित्त विभागाचे सदस्यही उपस्थित होते.

वित्तीय वर्ष 2024-25 दरम्यान, वेकोलिने एकूण ₹4,010.49 कोटी रुपयांचा कर भरला असून यामध्ये रोख व ITC (इनपुट टॅक्स क्रेडिट) दोन्हीचा समावेश आहे. ही उल्लेखनीय कामगिरी वेकोलिच्या पारदर्शक आर्थिक व्यवस्थापन, राष्ट्रनिर्माणातील कटिबद्धता आणि जबाबदार कॉर्पोरेट नागरिक म्हणून बजावलेल्या सकारात्मक भूमिकेचे प्रतीक आहे.

Popular Articles