spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अनिल मस्के यांची नागपूर ग्रामीण अप्पर पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती; सावनेरमधील दमदार कामगिरीची मिळाली पावती

नागपूर १०:  अनिल मस्के यांची नागपूर ग्रामीणचे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी सावनेर उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) म्हणून जबाबदारी सांभाळली असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी सावनेर व कलमेश्वर परिसरात अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करत उल्लेखनीय कामगिरी बजावली.

मस्के यांच्या कारकिर्दीत या भागातील जुगार, मद्यविक्री, रेती चोरी, कोळसा तस्करी यांसारख्या अवैध धंद्यांवर प्रभावी रोक बसली होती. त्यांचा दरारा एवढा होता की, अवैध व्यवसाय करणाऱ्यांच्या मनात त्यांच्या नावाचाही धसका होता.

त्यांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अनेक गुन्हेगार भूमिगत झाले, तर काहींनी आपला व्यवसायच थांबवला. त्यामुळे नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्वच अवैध व्यवसायिकांमध्ये आता त्यांच्या नव्या नियुक्तीमुळे दहशतीचं वातावरण पसरलं आहे.

मस्के यांच्या शिस्तप्रिय, धाडसी आणि भ्रष्टाचारविरोधी भूमिकेमुळे त्यांना ही जबाबदारी देण्यात आली असून, त्यांच्या नियुक्तीमुळे नागपूर ग्रामीणमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Popular Articles