Home Latest News तीन दिवसाच्या सततधार पावसामुळे महालगाव – तांडा रस्त्यावरील पूल वाहिला 

तीन दिवसाच्या सततधार पावसामुळे महालगाव – तांडा रस्त्यावरील पूल वाहिला 

0
391
किशोर साहू: मौदा, १०: मागील तीन दिवसापासून सतत धार पाऊस येत असल्याने नदी नाले ओसंडून वाहत असून, काल मंगळवार दिनांक आठ जुलै पासून मौदा तालुक्यातील गावागावातील रस्त्याच्या मधोमधे बांधलेले रपटे, पूल वरून पावसाचे पाणी वाहत असल्याने, तर कुठे रपटे व पुलच नसल्याने वाहतूक बंद झाल्याने अनेक गावांशी संपर्क तुटलेला होता. आज बुधवार दिनांक 9 जुलैला महालगाव – तांडा रस्त्यावरील पूल वाहून गेल्याने मौदा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असणाऱ्या महालगावच्या तालुक्यातील इतर गावांशी संपर्क तुटल्यामुळे या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामपंचायत महालगाव सरपंचा उषा नरेंद्र मोहतुरे, उपसरपंच किशोर आग्रे, सर्व ग्रामपंचायत सदस्य गण व समस्त नागरिकांनी केली आहे. या रस्त्यावरून नागरिकांनी आवागमन करू नये असे आव्हान या पुलाजवळील रस्त्यावर बॅरिकेट्स लावून अरोली पोलीस स्टेशन तर्फे करण्यात आले.