खापा :- निखिल आष्टनकर मित्र परिवारातर्फे खापा शहरात प्रथमच ‘खेळ पैठणीचा’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. आयुश्री आशिष देशमुख, उज्ज्वला लांडे, निधी नितीन तेलगोटे यांची उपस्थिती होती. महिलांनी उत्सुर्त प्रतिसाद देत अंदाजे बाराशे महिला उपस्थित होत्या. त्यातून शंभर महिलांनी स्पर्धेत सहभाग घेतला. सर्व महिलांनी आपापल्या चिंता विसरून, हसत-खेळत कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला.
खेळामधील प्रथम विजेत्या म्हणून रिना आकाश शेरेवार, द्वितीय भूमेश्वरी प्रदीप बोरकर तर तृतीय विजेता म्हणून अनिता सागर शेरेवार ठरल्या. विजेत्या महिलांना उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. आयुश्री देशमुख यांच्या हस्ते काढलेल्या लकी कूपनमध्ये सुनीता चौधरी यांचे नाव निघाले. त्यांना पैठणी देऊन गौरविण्यात आले. धुणी-भांडी करणाऱ्या या गरजू महिलेस पैठणी मिळाल्याने उपस्थित महिलांनी आनंद व्यक्त केला.




