spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रस्ते अपघातातील पीडितांच्या स्मरणार्थ वॉकेथॉन

गडचिरोली :- रस्ता अपघातातील पीडितांच्या स्मरणार्थ जागतिक दिवसानिमित्त रस्ते अपघात प्रतिबंधासाठी नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, गडचिरोली यांच्या वतीने आज वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले.

सकाळी ८ वाजता आयटीआय चौक, नवेगाव पेट्रोल पंप येथून या वॉकेथॉनला सुरुवात झाली. ‘रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी’, ‘सेफ ड्राईव्ह – सेव्ह लाईफ’, ‘जीवन अमूल्य आहे, नियमांचे पालन करा’ अशा जनजागृतीपर संदेशांद्वारे नागरिकांना रस्ते सुरक्षा नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले. वॉकेथॉनचे मार्गक्रमण उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, गडचिरोली येथे येऊन संपन्न झाले.

या उपक्रमामध्ये उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, कार्यालयीन कर्मचारी, विविध नागरिक तसेच आयटीआय संस्थेतील सुमारे 200 विद्यार्थी आणि सर्व शिक्षकवृंद यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित रस्ते सुरक्षा संदेश तरुण पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविला.

वॉकेथॉननंतर विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षाविषयक संदेश असलेली नोटबुक तसेच रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी विशेष टोप्या वाटण्यात आल्या. या माध्यमातून वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

Popular Articles