spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पहिले पंतप्रधान भारतरत्न पं.जवाहरलाल नेहरू यांना विनम्र अभिवादन

नागपूर :- आधुनिक भारताचे निर्माता, देशाचे पहिले पंतप्रधान भारतरत्न पं.जवाहरलाल नेहरू आणि आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहूजी साळवे यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.

मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या दालनात आयोजित छोटेखानी समारंभात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी पं. नेहरू यांच्या तैलचित्राला पुष्प अर्पण करीत अभिवादन केले.

याप्रसंगी उपायुक्त मिलिंद मेश्राम, उपायुक्त राजेश भगत, सहायक आयुक्त श्याम कापसे, कार्यकारी अभियंता रवींद्र बुंधाडे, मुख्य स्वच्छता अधिकरी डॉ. गजेंद्र महल्ले, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, उपअभियंता राहुल देशमुख, अमोल तपासे, प्रमोद हिवसे, जितेंद्र धकाते, शैलेश जांभूळकर यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते. तत्पूर्वी अंबाझरी उद्यान स्थित वस्ताद लहूजी साळवे यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले.

Popular Articles