spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘ऑपरेशन यू-टर्न’ – नागपूर शहरात मद्यधुंद वाहनचालकांविरुद्ध कठोर कारवाईसाठी नागपूर पोलिसांची विशेष मोहीम

नागपूर ११ : नागपूर शहरात होणाऱ्या अपघातांमध्ये घट घडवण्यासाठी नागपूर शहर पोलिसांकडून ‘ऑपरेशन यू-टर्न’ या विशेष
मोहिमेची सुरुवात करण्यात येत आहे. या मोहिमेमार्फ त मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई
करण्यात येणार आहे.
ऑपरेशन यू-टर्नचे मुख्य मुद्दे:
1. मद्यपान करून वाहन चालविणे:
अपघातांचे एक प्रमुख कारण असल्यामुळे यावर थेट कारवाई केली जाईल.
2. ३३ महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी:
संशयित वाहनचालकांची ब्रेद अ‍‍ॅनालायझर मशीनद्वारे तपासणी केली जाईल. मद्यधुंद आढळल्यास संबंधित
व्यक्तींवर मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १८५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात येईल.
3. रात्री उशिरा विशेष नाकाबंदी:
रात्री ११:०० ते २:०० या वेळेत ५ महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी होईल, जेथे मद्यधुंद वाहनचालकांचे प्रमाण
जास्त आहे.
4. वाहन जप्ती:
मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्यांची वाहने प्रादेशिक वाहतूक कार्यालयात जप्त करण्यात येतील.
5. पुनरावृत्ती करणाऱ्यांवर कठोर कारवाई:
गुन्हेगारांची माहिती डेटाबेसमध्ये नोंदवली जाईल. पुन्हा गुन्हा करणाऱ्यांवर BNS च्या कलम 110 नुसार
(खुनासारख्या अपराधाचा प्रयत्न)अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल.
6. पब व परमिट रूममध्ये जनजागृती:
बॅनर आणि घोषणांद्वारे मद्यपान करून वाहन चालवू नये, याबाबत लोकांना सतर्क करण्यात येईल.
7. परवाना निलंबन:
संबंधित वाहनचालकांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात येतील.
8. स्मार्ट ट्रॅफिक बूथचा वापर:
जनतेपर्यंत सतत सूचना पोहोचवण्यासाठी स्मार्ट ट्रॅफिक बूथवरून घोषणा करण्यात येतील.
9. महाविद्यालये, कार्यालये व संस्था याठिकाणी जनजागृती:
विद्यार्थ्यांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये अपघातांबाबत जागरूकता निर्माण केली जाईल.
आतापर्यंतची प्रगती:
नागपूर पोलिसांनी अपघात कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे:
• जनवरी–जून २०२४ मध्ये एकूण अपघात: १७८
• जनवरी–जून २०२५ मध्ये एकूण अपघात: १४२
• अपघातांमध्ये घट: २०.२२%
• जनवरी–जून २०२४ मध्ये मृत्यू: १७१
• जनवरी–जून २०२५ मध्ये मृत्यू: १२६
• मृत्यूंमध्ये घट: २१.१३%
ही मोहीम राबविण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे नागपूरमधील अपघातात होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात आणखी घट घडवून
आणणे आणि रस्त्यांवरील सुरक्षितता वाढवणे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.