– माजी जि प सदस्य कैलास बरबटे यांच्या प्रयत्नांना यश
किशोर साहू, मौदा, ता. २५ :- सध्या संपूर्ण तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी विविध विकास कामे मंजूर करणे व त्यांचे भूमिपूजन करणे या दोन्ही कार्यक्रमांच्या धुमधडाका सुरू आहे. चाचेर – निमखेडा जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या विविध गावांमध्ये विविध विकास कामे मंजूर करण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास बरबटे यांनी महसूल मंत्री तथा पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जन सुविधा (विशेष अनुदान )कामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थ नेतृत्वाखाली जिल्हा नियोजन समितीकडून एक कोटी चाळीस लक्ष रुपयांच्या निधी मंजूर केला. तसे पत्रही त्यांनी शुक्रवार (दि. 21 नोव्हेंबर)ला पाठविलेले आहे.
विकास कामांसाठी निधी मंजूर केल्याबद्दल माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास बरबटे ,भारतीय जनता युवा मोर्चा उपाध्यक्ष संजू वाघमारे, महामंत्री कैलास बरबटे ,उपसरपंच धनराज हारोडे, मोतीराम घरजाळे सह सर्कल अंतर्गत येणाऱ्या सर्व भाजपा व भाजयूमो पदाधिकारी व नागरिकांनी बावनकुळे यांचे आभार मानले आहे.




