नागपूर :- प्रहार समाज जागृती संस्था ही समाजात सैनिकी मानसिकतेचा प्रसार करणारी व त्यादृष्टीने कार्यरत असलेली नागपुरातील एक प्रतिष्ठित संस्था आहे. तीस वर्षापूर्वी ही संस्था लेफ्ट. कर्नल सुनिल देशपांडे VSM यांनी सुरु केली होती. सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या ‘प्रहार’ या चित्रपटाचे लष्करी सल्लागार लेफ्ट. कर्नल सुनिल देशपांडे हे होते.
प्रहार समाज जागृति संस्था व सी.पी.एन्ड बेरार एज्युकेशन सोसायटी यांनी मिळून रविनगर येथे प्रहार विद्यालय ही शाळा २००३ साली सुरु केली. पुढे प्रहार विद्यालय शाळेत सैनिकी शिक्षणाचा अंतर्भाव करण्यात येऊन या शाळेचे नाव प्रहार मिलिटरी स्कूल असे करण्यात आले. २०२२ पर्यंत या शाळेचे कार्य सुरु होते. पुढे सी.पी.एन्ड बेरार एज्युकेशन सोसायटी व प्रहार समाज जागृति संस्था हे आपल्या एग्रीमेंट मधून परस्पर सामंजस्याने वेगळे झाले. त्यावेळी या शाळेला प्रहार समाज जागृती संस्थेने संमत्तीने दिलेले ‘प्रहार’ हे नाव बदलावे व दुसरे नाव द्यावे अशी विनंती सी.पी.एन्ड बेरार एज्युकेशन सोसायटी ला केली. माञ या संस्थेने हे नाव बदलले नाही. या शाळेत अलीकडे झालेला एका अक्षम्य गैरप्रकारापायी प्रहार समाज जागृती संस्थेला मनस्ताप भोगावा लागत आहे. या पत्रकार परिषदेत आम्ही स्पष्ट सांगतो कि, प्रहार समाज जागृती संस्था, ही मूळ व एकमेव संस्था आहे जीचा सी.पी.एन्ड बेरार एज्युकेशन सोसायटी व सी.पी.एन्ड बेरार एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित प्रहार मिलिटरी स्कूल यांसोबत काहीही संबंध नाही. या संस्थेने शाळेचे नाव तत्काळ बदलावे यासाठी आम्ही त्यांना कायदेशीर नोटीस पाठवणार आहोत. माझी सर्व पालकांना व नागरिकांना विनंती आहे कि त्यांनी प्रहार समाज जागृति संस्थेची शाळा ‘प्रहार वासुदेवलीला मिलिटरी स्कूल’ ही उमरेड रोडवरील प्रहारगढ येथे आहे याची नोंद घ्यावी. या व्यतिरिक्त प्रहार संस्थेचे पांडे लेआऊट येथे ‘प्रहार वासुदेवलीला विद्याकुंज’ व ‘प्रहार डिफेंस अकॅडेमी’ हे उपक्रम सुद्धा आहेत.
प्रहार समाज जागृति संस्थेच्या अध्यक्षा शमा देशपांडे असून संस्थेच्या सचिव फ्लाईट लेफ्ट. शिवाली देशपांडे या आहेत. प्रहार समाज जागृति संस्थेच्या अध्यक्षा व सचिव यांचा ‘प्रहार वासुदेवलीला मिलिटरी स्कूल’, ‘प्रहार वासुदेवलीला विद्याकुंज’ व ‘प्रहार डिफेंस अकॅडेमी’ या व्यतिरिक्त कुठल्याही शाळेची संबंध नाही याची नोंद घ्यावी.








