spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दुष्काळाने सोयाबीन हिरावलं

– तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?

मुंबई :- राज्यभरात दुष्काळाचा दाह वाढला आहे. हातातोंडाशी आलेलं सोयाबीन पाण्याअभावी करपलं. आता मराठवाड्यासह विदर्भात सोयाबीनची खळे सुरु आहेत. शेतकरी हाती लागेल तेवढं सोयाबीन बाजारात नेताना दिसत आहे. आवक प्रचंड घसरली आहे.कृषी पणन विभागाच्या माहितीनुसार, 13 ऑक्टोबर रोजी राज्यात 12 हजार 44 क्विंटल सोयाबीन बाजारपेठेत आलं होतं. मराठवाड्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना यंदा मोठा फटका बसलाय. पावसाने दडी मारल्याने सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली असून, बीड जिल्ह्यातील हेक्टरी उत्पादन तब्बल 73 टक्क्यांनी घटल्याचं पीक कापणी प्रयोगांच्या प्राथमिक आकडेवारीतून समोर आलंय. त्यामुळे आधीच दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता कर्ज फेडायचं कसं, असा प्रश्न निर्माण झालाय.

बीडमध्ये सोयाबीनचं उत्पादन 73 टक्क्यांनी घटलं!

बीड जिल्ह्यात मागील 5 वर्षांत सोयाबीनचं सरासरी हेक्टरी उत्पादन 1,534.2 किलो होतं. मात्र, यंदा हेच उत्पादन अवघं 410 किलो प्रति हेक्टर इतकं राहिलंय. म्हणजेच हेक्टरी उत्पादनात तब्बल 1,124 किलोची घट झाली असून, उत्पादन 73 टक्क्यांहून अधिक घटलंय.मराठवाड्यात मागील खरीप हंगामात 46 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यापैकी 25 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनातील या घटीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.

पावसाच्या खंडाचा सोयाबीनला फटका

सोयाबीन हे पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असलेलं पीक आहे. 15 जून ते 15 जुलै या कालावधीत वेळेवर पेरणी, सुरुवातीला जमिनीत पुरेसा ओलावा आणि त्यानंतर नियमित पाऊस मिळणं गरजेचं असतं. मात्र, यंदा मान्सूनचं उशिरा आगमन झालं. त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचे मोठे खंड पडले. त्यामुळे पावसावर अवलंबून असलेल्या सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालं.

सोयाबीनला किती भाव मिळतोय?

राज्यभरात सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना सध्या मोठ्या नुकसानाला समोरं जावं लागत आहे. पावसाभावी पीक उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले असून आवकही रोडावली आहे. राज्यभरात 12 ऑक्टोबर रोजी 1 लाख 40 हजार 200 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. क्विंटलमागे शेतकऱ्याला 6 हजार 400 ते 6 हजार 800 रुपयांचा दर मिळत आहे.

Popular Articles