– संविधाना शिवाय या देशात कुठलाही ग्रंथ नाही ! एड. मिलिंद खोब्रागडे
– संविधान चौकात भीम बुद्ध गीतांचा संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम आज
नागपूर :- जल्लोष भारतीय संविधानाचा, संविधान बचाव आंदोलन यांच्या अंतर्गत बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान चौकात संविधानदिन संयुक्त समारोह कार्यक्रम “भीम बुद्ध गीतांचा संगीतमय प्रबोधनात्मक” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दलित पॅंथर, सम्राट अशोक धम्म सेना, कर्जमुक्ती सेना, समता सैनिक दल, रिपा सेक्युलर राष्ट्रीय रिपब्लिकन जन मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन संयुक्त समारोह कार्यक्रमात अध्यक्ष मा.ॲड.मिलींद खोब्रागडे तसेच उद्घाटक संदीप पाटील आणि सहउद्घाटक संविधान बचाव आंदोलनाचे कार्याध्यक्ष रवीभाऊ शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होईल. संविधान चौकाचे फलक ज्यांच्या प्रयत्नाने लावण्यात आले ते म्हणजे रविभाऊ शेन्डे यांच्या जाहीर सत्कार समारंभ यावेळी करणार असल्याचे परिषदेत एड. मिलिंद खोब्रागडे यांनी पत्रकारांना सांगितले.

संविधान दिनी कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे आपल्या देशाचा सन्मान वाढविण्यासाठी प्रत्येकाच्या घरी संविधान पोहचले पाहिजेच संविधानाशिवाय या देशात कुठलाही ग्रंथ नाही असे खोब्रागडे यांनी पत्रकारांना सांगितले. याप्रसंगी उपस्थित मंचावरील एड.मिलिंद खोब्रागडे, एड.सुरेश घाटे, राजू इंगळे, बाळासाहेब गावंडे, मेघराज राऊत, प्रकाश बौद्ध, महेंद्र सातपुते, सुरेश सुखदेवे, नीरज निखाडजे, सरोज मेश्राम, पपीता जुनघरे, सिद्धार्थ मांडवे, कल्पना अलोने, एड. पूनम चंदेल, राजू गायकवाड, रामचंद्र सोनटक्के, संदीप रामटेके आणि भंते कुशल धम्म यांची उपस्थिती होती.




