spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पांढरकवडा येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज जाहीर प्रचार सभा

सुरज बंडीवार, पांढरकवडा :- आगामी नगरपरिषद निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अनेक बैठका, प्रचार सभांचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज पांढरकवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जाहीर प्रचार सभा होणार आहे.

पांढरकवडा नगरपरिषद निवडणूकीच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज दुपारी २ वाजता क्रीडा संकुल येथे सभा होणार असून शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ अभिनय नहाते व २२ नगरसेवक पदाच्या उमेदवाराकरीता प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत.

पांढरकवडा नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजप, काँग्रेस, शिवसेना ( ठाकरे गट ) या उमेदवाराबद्दल आज होणाऱ्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.