– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. सोमवार (ता.1) शोध पथकाने 100 प्रकरणांची नोंद करून 83,400 रुपयाचा दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी रस्ता,फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी थुंकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 200 रूपयांची वसुली करण्यात आली. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 21 प्रकरणांची नोंद करून 8,400 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. १०० दंड) या अंतर्गत 9 प्रकरणांची नोंद करून 900 रुपयांची वसुली करण्यात आली.दुकानदाराने रस्ता,फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 6 प्रकरणाची नोंद करून 2,400 रूपयांची वसुली करण्यात आली.मॉल,उपहारगृहे, लॉजिंग,बोर्डिंगचे हॉटेल, सिनेमाहॉल,मंगल कार्यालये,कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर यांनी रस्ता,फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून 4,000 रूपयाची वसुली करण्यात आली.वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 10 प्रकरणांची नोंद करून 35,500 रुपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर,मटनविकेरता, यांनी रस्ता,फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1,000 रूपयाची वसुली करण्यात आली.

वर्कशॉप,गॅरेजेस,व इतर दुरूस्तीचे व्यावयिकाने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयाची वसुलीद करण्यात आली.उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 35 प्रकरणांची नोंद करून 7,000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 12 प्रकरणांची नोंद करून रु.12,000 चे दंड वसूल करण्यात आलेला आहे. हरित लवाद यांनी आदेशीत व र्निदेशीत केल्यानुसार विवाह सभागृह इत्यादी ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1,000 रूपयाची वसुली करण्यात आली. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत मे. मॅक डोनाल्डस यांनी चेंबरमध्ये उरलेले अन्न टाकल्यामुळे व डिसेल्टिंग चेंबर न आढळल्यामुळे रू.10,000 दंड आकारण्यात आले. हनुमाननगर झोन अंतर्गत मे. पुजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 दंड वसुल करण्यात आले.गांधीबाग झोन अंतर्गत मे. कल्पना किराणा स्टोअर्सयांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000 चे दंड वसूल करण्यात आले. लकडगंज झोन अंतर्गत मे. सचिन टिन सप्लायर यांनी रस्त्यालगत मोठया प्रमाणात टिनशेड पसरविल्यामुळे रू.10,000 दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 4 प्रकरणांची नोंद करून रू.35,000 दंड वसूल केला.








