कामाला लागलेल्या कार्यकर्त्यांची गणित बिघडले, कभी खुशी कभी गम अशी स्थिती
खापा, १४ : तालुक्यातील 75 ग्रामपंचायत सरपंच पदाचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपला. या ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण 9 जुलै, 2025 बुधवारी जाहीर करण्यात आले. यात 38 ग्रामपंचायतीवर महिलाराज राहणार आहे तर 37 ग्रामपंचायत सरपंच पदी पुरुष विराजमान होतील. या आरक्षणात अनेकांचे गणित बिघडले. यामुळे ग्रामपंचायत क्षेत्रात कही खुशी कही गम अशी स्थिती निर्माण झाली आहे.
सरपंच पदाची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांच्या निर्देशानुसार सावनेर तहसील कार्यालयातील सभागृहात तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या अध्यक्षतेखाली गटविकास अधिकारी मनोजकुमार हिरुळकर, नायब तहसीलदार कैलास अल्लेवार, नायब तहसीलदार राजेश शेगावकर, निवडणूक लिपिक रवींद्र घरजाळे, तांत्रिक सहाय्यक मनोज शास्त्रकार यांच्या उपस्थितीत विशेष सभा घेण्यात आली, तद्ववत लहान मुलाच्या हाताने ईश्वरचिठ्ठी काढून आरक्षण जाहीर करण्यात आले. हे सरपंच पदाचे आरक्षण 2025 ते 2030 पर्यंत म्हणजे पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी राहणार आहे. सावनेर तालुक्यातील आरक्षण असे- अनुसूचित जाती खुला प्रवर्ग करिता आरक्षित – 8 ग्रामपंचायत , अनुसूचित जाती महिला करिता आरक्षित – 8 ग्रामपंचायत, अनुसूचित जमाती खुला प्रवर्ग आरक्षित – 4 ग्रामपंचायत अनुसूचित जमाती महिला करिता आरक्षित – 4 ग्रामपंचायत, नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला आरक्षित- 10, नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला करिता आरक्षित-10 ग्रामपंचायत, सर्वसाधारण खुला प्रवर्ग आरक्षित-15 ग्रामपंचायत, सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित-16 ग्रामपंचायत असे एकूण 75 ग्रामपंचायती.
विशेष म्हणजे ज्या ग्रामपंचायतवर पुरुषांची नजर होती. त्या ग्रामपंचायत महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांचे गणित बिघडले.यात अनेकांच्या सरपंच पदाच्या स्वप्नावर पाणी फेरल्या गेले. महिलांसाठी 50 टक्के जागा आरक्षित करण्यात आल्या. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणामुळे अनेक ग्रामपंचायती पुरुष राज संपुष्टात येणार आहे. त्यामुळे त्यांचे स्वप्न भंगले. सावनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निहाय आरक्षण असे – अनुसूचित जाती खुल्या प्रवर्गाकरिता आरक्षित ग्रामपंचायत गडेगाव, खुबाळा, पटकाखेडी, खैरीढालगाव, ईसापुर, किरणापुर, वाकी, बडेगाव, अनुसूचित जाती महिला करिता आरक्षित ग्रामपंचायत मंगसा, तिघई, सील्लेवाडा, सावरमेंढा, आजनी, टेंभुरडोह, पोटा, नरसाळा, अनुसूचित जमाती करिता सरपंच पदाच्या आरक्षित ग्रामपंचायत चिचोली, नांदा गोमुख, भानेगाव, दहेगाव रं. अनुसूचित जमाती महिला करिता आरक्षित ग्रामपंचायत टाकळी भ., सिल्लोरी, उमरी भ., केळवद , नागरिकांचा मागासवर्ग खुल्या प्रवर्गाकरिता आरक्षित ग्रामपंचायत मानेगाव, कोदेगाव, कुसुंबी, गुमगाव, निमतलाई, जलालखेडा, वाकोडी, वाघोडा, खुरसापार, कोच्छी, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला करिता आरक्षित ग्रामपंचायत सालई ,सोनपूर ,जेतपूर, वलनी , भेंडाळा , सीरोंजी, बिचवा, खैरी पंजाब, सिंदेवाणी, माळेगाव जो. सर्वसाधारण खुला प्रवर्गाकरिता आरक्षित ग्रामपंचायत पंढरी ज., खानगाव, सावळी मो., कोथुळना, माळेगाव टा, गोसेवाडी, सर्रा, नागलवाडी, रायवाडी, उमरी जा., कोटोडी, खापा, खर्डुका, पाटणसांवग , नांदोरी. सर्वसाधारण महिला करिता आरक्षित ग्रामपंचायत जोगा, रामपुरी, परसोडी, रोहणा, पिपळा डाग बंगला, वेलतुर, चांपा, ब्रह्मपुरी, खुरजगाव ,इटनगोटी, हत्तीसरा, तेलंगखेडी, जटामखोरा, सावंगी, गडमी, बोरुजवाडा.
ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीच्या वेळी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते संबंधित ग्रामपंचायत मधील आजी-माजी सरपंच सदस्य इच्छुक उमेदवार तरुण तथा ग्रामस्थ उपस्थित होते




