सरपंच जयश्री मडावी यांनी घेतली कठोर भूमिका
ठिकठीकाणी अतिक्रमनाच्या तक्रारी
रामटेक १४ -: तालुक्यातील अनेक गाव अतिक्रमनाच्या विळख्यात सापडली आहे. अतिक्रमणामुळे गावाच्या सुंदरतेला खिळ बसते. अतिक्रमनामुळे विकासाला मोठे अडथळे निर्माण होत असतात त्यामुळे गावात अतिक्रमण नकोच असे मत असणाऱ्या ग्रामपंचायत शितलवाडीच्या सरपंच जयश्री मडावी कठोर भूमिका घेतली आहे. अतिक्रमण झालेले असल्याच्या काही तक्रारी आल्या तेव्हा सरपंच जयश्री मडावी तथा सदस्यांनी सदर विषय गंभीरतेने घेत लगेच या विरोधात कारवाई सुरू केली आहे. अतिक्रमण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे सरपंच जयश्री मडावी यांनी स्पष्टपणे अतिक्रमण करणाऱ्यांना बजावले आहे.
ग्रामपंचायत शितलवाडी ही तालुक्यात आर्थिक दृष्टिकोनातून सधन असलेली ग्रामपंचायत मानल्या जाते. येथील रहिवाशांमध्ये विशेषतः अधिकारी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने असल्याने येथे कर वसुली सुद्धा योग्य प्रमाणात होत असते. परिणामस्वरूप गाव विकास सुलभतेने साधता येतो. असे असले तरी मात्र या शितलवाडी गावामध्ये काही ठिकाणी काही नागरिकांनी अतिक्रमण केल्याच्या तक्रारीमध्ये कमालीची वाढ झालेली आहे या तक्रारी सरपंच जयश्री मडावी यांच्यापर्यंत पोहोचल्या असता त्यांनी सदर विषय गंभीरतेने घेत सदस्यांना याबाबत अवगत करून अशा काही अतिक्रमण धारकांच्या विरोधात कठोर पाऊल उचलले आहे. काहींना नोटीस बजावली आहे तर काही सुशिक्षित समजदार अतिक्रमणधारकांनी स्वतःहूनच त्यांनी केलेले अतिक्रमण काढलेले आहे. ज्या अतिक्रमण धारकांनी स्वतःहून त्यांनी केलेले अतिक्रमण काढले नाही त्यांच्या विरोधात सक्तीची कारवाई करण्यात येईल असे शितलवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच जयश्री मडावी यांनी अतिक्रमण विरोधी कारवाई बाबत बोलताना सांगितले तेव्हा येत्या काही दिवसांमध्ये शितलवाडी गाव हे अतिक्रमणमुक्त होण्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागले आहे.





