spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नवनियुक्त पोलीस निरीक्षक मानकर यांचे स्वागत

सचिन चौरसिया रामटेक  १४ :- रामटेक येथे नुकतेच पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारलेल्या  रविंद्र मानकर साहेब यांचे व्हाँईस आँफ मिडीया पत्रकार संघटनेच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. जिल्ह्यातील ठाणेदारांच्या नुकत्याच बदल्या झाल्या असून रामटेकचे पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांची नुकतेच बदली पूणे येथे झाली असून त्यांच्या जागी रामटेक पोलीस स्टेशनचे नवीन पोलीस निरीक्षक म्हणून रवींद्र मानकर यांनी नुकताच पदभार सांभाळलेला आहे. ते यापूर्वी नागपूर ग्रामीणचे सायबर सेल मध्ये कार्यरत होते. त्यांना पोलीस यंत्रणाच्या दांडगा अनुभव आहे. करीता (दि.११) जुलै रोजी व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटना रामटेकच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशन रामटेक येथे त्यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले व पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान नवनयुक्त पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर यांनी पत्रकारांसोबत विविध विषयावर मनसोक्त संवाद साधला. यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया पत्राकार संघ रामटेकचे अध्यक्ष राजू कापसे, सरचिटणीस पंकज बावनकर, प्रसिद्धी प्रमुख सचिन चौरसिया, सदस्य सुरेंद्र बिरणवार व प्रवीण गिरडकर उपस्थित होते


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.