Related Posts

बिबट्याच्या प्रश्नासंदर्भात लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेणार 

<p><strong>&&num;8211&semi; भविष्यात बिबट्यांच्या हल्ल्यात एकही मृत्यू होणार नाही यासाठी यंत्रणा सतर्क – वन मंत्री गणेश नाईक<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> राज्यातील मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाकडून ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत&period; भविष्यात एकही मनुष्य मृत्यूमुखी पडणार नाही&comma; यासाठी यंत्रणा सतर्क केली आहे&period; यासंदर्भात लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>राज्यातील बिबट्यांच्या हल्ल्यासंदर्भातील लक्षवेधीवर उत्तर देताना ते बोलत होते&period; यावेळी सदस्य डॉ&period; जितेंद्र आव्हाड&comma; अतुल भातखळकर&comma; सुनील प्रभु आदींनी ही लक्षवेधी सूचना मांडली होती&period;<&sol;p>&NewLine;<p>वनमंत्री नाईक म्हणाले की&comma; पुणे&comma; अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यात बिबट्यांच्या संख्येत वाढ झाली आहे&period; बिबट्या हा प्राणी केंद्रीय वन्यजीव संरक्षण कायद्याच्या शेड्यूल एक मध्ये असल्याने कार्यवाही करण्यात मर्यादा आहेत&period; त्यामुळे बिबट्याचा समावेश शेड्यूल एक मधून शेड्यूल दोन मध्ये करण्याची विनंती केंद्र शासनाकडे केली आहे&period; त्याबरोबर केंद्रीय वन विभागाने राज्यातील पाच बिबट्यांच्या नसबंदीची परवानगी दिली असून याबाबतची कार्यवाही सुरू झाली आहे&period; सहा महिन्यात त्याचा अहवाल आल्यानंतर आणखी बिबट्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात येईल&period;<&sol;p>&NewLine;<p>पुणे जिल्ह्यात जुन्नर येथे बिबट्यांसाठी बचाव केंद्र सुरू करण्यात आले असून त्याची क्षमता वाढविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत&period; याशिवाय अहिल्यानगर मध्येही बचाव केंद्र सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत&period; पुणे जिल्ह्यात 1200 पिंजरे देण्यात आले असून नाशिक व अहिल्यानगरमध्येही पिंजरे देण्यात आले आहेत&period; भविष्यात आणखी पिंजरे वाढविण्यात येतील&period; तसेच लोकप्रतिनिधींनी मागणी केल्यास तातडीने पिंजरे पुरविण्याच्या सूचना विभागास देण्यात आले आहेत&period; तसेच बिबट्यांवर लक्ष ठेवून त्याच्या हालचालींची माहिती ग्रामस्थांना देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून यंत्रणा उभी करण्यात आली आहे&period; बिबट्यांचा वावर असलेल्या परिसरातील शाळांची वेळ बदलण्यात आल्याची माहितीही मंत्री नाईक यांनी यावेळी दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>बिबट्यांचा वावर असलेल्या ठिकाणी गस्त घालण्यासाठी गृह&comma; वन व महसूल विभागाची पथके तयार करण्यात आली आहेत&period; यामध्ये स्थानिक तरुणांना सहभागी करून घेण्याचा विचार करण्यात येत आहे&period; जंगलातच वन्य जीवांना खाद्य मिळावे&comma; यासाठी प्रयत्न सुरू आहेत&period; जंगलाच्या सीमेवर बांबूचे कुंपण लावण्याचे नियोजन आहे&period; या प्रश्नांवर सर्व लोकप्रतिनीधी&comma; वन व महसूल विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन सर्व प्रश्न सोडविण्यात येतील&comma; असेही त्यांनी यावेळी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>बिबट्याच्या हल्ल्यासंदर्भात अधिवेशन काळात लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची महसूल विभागनिहाय बैठका घेऊन मार्ग काढण्याची विनंती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केली&period;<&sol;p>&NewLine;<p>या चर्चेत सदस्य डॉ&period;जितेंद्र आव्हाड&comma; नाना पटोले&comma; शरद सोनवणे&comma; अब्दुल सत्तार&comma; कृष्णा खोपडे यांच्यासह विविध सदस्यांनी सहभाग घेतला&period;<&sol;p>&NewLine;