Related Posts

स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाच्या कामकाजाचे ऑडिट होणार – नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> दत्तक वस्ती योजनेच्या जागी 2013 पासून राबवण्यात येत असलेल्या स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान वस्ती स्वच्छता योजनेचे ऑडिट करण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>विधानसभा सदस्य तुकाराम काते&comma; अमीन पटेल&comma; अमित साटम&comma; प्रकाश सुर्वे या सदस्यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली&period;<&sol;p>&NewLine;<p>नगरविकास राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी सांगितले की&comma; स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान योजनेची अंमलबजावणी 1 फेब्रुवारी 2013 पासून संपूर्ण मुंबई शहरात करण्यात आली होती &period; या योजनेनुसार 200 घरांमागे एक युनिट तयार करण्यात आले आणि त्या प्रत्येक युनिटसाठी महापालिकेकडून प्रती महिना 5&comma;400 रुपये&comma; तसेच प्रबोधनासाठी 600 रुपये&comma; असे एकूण 6&comma;000 रुपये अनुदान देण्यात येते&period;<&sol;p>&NewLine;<p>या योजनेची रचना अशी आहे की वस्तीतील स्वच्छतेसाठी पुढाकार घेणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी रहिवाशांकडून कुटुंबाकडून 20 रुपये आणि व्यावसायिक आस्थापनांकडून 50 रुपये गोळा करायचे&period; या रकमेच्या संकलनातून आणि महापालिकेकडून मिळणाऱ्या अनुदानातून संस्थांनी आवश्यक स्वच्छता उपकरणे खरेदी करून स्वयंसेवकांच्या मदतीने वस्ती स्वच्छ ठेवण्यात येते&period;<&sol;p>&NewLine;<p>नगरविकास राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की&comma; या योजनेतील स्वयंसेवक हे सफाई कामगारांच्या श्रेणीत मोडत नसल्याने त्यांना किमान वेतन लागू होत नाही&period; महापालिकेचे नियमित सफाई कर्मचारी वॉर्ड कार्यालयांतून आपले काम पूर्वीप्रमाणेच करत असतात&semi; ही योजना त्याला पूरक स्वरूपाची आहे&period; त्याचबरोबर स्वयंसेवकांना मिळणारे सहाय्य वाढवणे तसेच स्वच्छता उपकरणांसाठी देण्यात येणारी मदत वाढवण्याचा प्रस्ताव महापालिकेकडून विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;