खापा, १४ : वाहन चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात खापा पोलिसांना यश मिळाले आहे. या आरोपीकडून चोरीची एक दुचाकी हस्तगत करत एक गुन्ह्यांची कबुली केल्याची माहिती सपोनि किशोर भुजाडे यांनी शनिवार (12 जून) दिली आहे.
उमरी जांभळा पाणी ता. सावनेर जिल्हा नागपूर येथील रहिवासी पतीराम मनसाराम वरठी, (वय 50 वर्ष) यांची दुचाकी चोरीला गेली होती. 26 मे रोजी पतीराम यांचा मुलगा रितिक वरठी हा रात्री खापा येथे जवाहर हायस्कूल मध्ये लग्न समारंभाला आले असता बाहेर मोकळ्या जागेत पार्किंग केलेली दुचाकी चोरीला गेली होती. खापा पोलिसांनी 26 मे रोजी वाहन चोरीचा गुन्हा दाखल केला होता. पोलिस चोराच्या शोधात होते.
गुप्त माहितीच्या आधारे 11 जून रोजी रात्री 9.30 वाजता दरम्यान वाकोडी फाटा जवळ नाकाबंदी करून आरोपीला दुचाकी क्रमांक एम एच 40 बी डी 7299 वाहनासह पकडण्यात आले. त्या दुचाकीबद्दल त्याला विचारणा केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. कमलेश रामदास पंधरे (वय 27 वर्ष) रा. बिल्डींग कॉ नं. 201 पंतप्रधान आवास योजना, नविन नगर, पारडी नागपूर असे नाव सांगितले. त्याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त केली. शनिवार 12 जून रोजी माननीय न्यायालया समक्ष हजर केले. सदरची कामगिरी सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर भुजाडे मार्गदर्शनाखाली ए एस आय नारायण बोरकर, पोलीस शिपाई परवेज शेख, राहुल रेवतकर यांनी केली आहे.



