– राज्याला अपघातमुक्त करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना नाही – नव निर्माण बहुउद्देशिय संस्थेचे मत
– नवनिर्माण बहुउद्देशीय संस्थे तर्फे प्रवक्ते मनोज मालवी यांचे प्रोजेक्ट 5 वर्षाचे आहे ते नागपुरात लागू करा !
नागपूर :- नवनिर्माण बहुउद्देशीय संस्थेतर्फे प्रवक्ते मनोज मालवी यांचे प्रोजेक्ट ५ वर्षाचे आहे ते नागपूरात लागू करा. असे उद्देश त्यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्याला अपघातमुक्त आणि ट्रफिक जाम मुक्त राज्य बनविण्यासाठी येणारा एकुण खर्च ८,९०० करोड रुपये आहे. संपूर्ण विदर्भाला अपघात मुक्त आणि ट्रॅफिक जाम मुक्त क्षेत्र बनविण्याचा एकूण खर्च १,९०७ करोड रुपये आहे. नागपूर जिल्ह्याला अपघात मुक्त आणि ट्रॉफिक जाम मुक्त क्षेत्र बनवायचे असेल तर एकूण ६५० कोटी रुपये खर्च करावा लागेल. जो पर्यंंत सरकार हा खर्च करत नाही व एनएनबीएस- एनजीओ- नागपूर ला हे काम देत नाही तो पर्यंत नागपूर जिल्ह्याला, विदर्भाला आणि महाराष्ट्र राज्याला अपघातमुक्त करण्याची कल्पना कोणाकडेच नाही. ट्रॅफिक विभागाकडे, सरकार कडे किंवा इतर कुठल्याही संस्थेकडे किंवा व्यक्तीकडे ही समस्या दूर करण्याचे उपाय नाही. नवनिर्माण बहुउद्देशीय संस्था नागपूर मागील १३ वर्षापासून अनेक सामाजिक कार्य करत आहे. त्यापैकीच एक कार्य म्हणजे नागपूर शहराला अपघात मुक्त आणि ट्राफिक जाममुक्त शहर बनविण्याचे कार्य करत आहे. अनेक प्रयत्न केले जात असून आमच्या प्रयत्नातून लक्षात आले की हे काम करण्यासाठी जी गंभीरता नेत्यांकडे, सरकारकडे व ट्रॅफिक पोलीस विभागाकडे असावी लागते ती गंभीरताच या सर्वांकडे नाही. तेरा वर्षाच्या अनुभवातून आमच्या लक्षात आले म्हणून आम्ही आज सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. नागपूर शहरात रोज एक्सीडेंटमुळे बरबाद होणार्या परिवारांची मला जास्त चिंता आहे म्हणून हा मुद्दा घेऊन मी पत्रकार परिषदेमध्ये मांडत आहे. हा प्रोजेक्ट पाच वर्षाचा असून नागपुरात लागू करावा असे मी शासनाला मागणी करत आहे. विषय फक्त महाराष्ट्राचा आहे. या महाराष्ट्रात रोज ४१ व्यक्तींचा मृत्यू होतो आणि ८२ व्यक्ती गंभीर जखमी होतात असे आम्ही रिसर्च केलेले आहेत. अशी माहिती पत्रपरिषदेत संस्थेचे प्रवक्ते मनोज मालवी यांनी दिली. याप्रसंगी संस्थापक रवी गाडगे पाटील, अध्यक्ष दिलीप नरवडीया, राजेश कुंभलकर, भगवानदास राठी, रमण पैगवार, नरेश निमजे, चंद्रकांत मोखारे, अश्विन हेडाऊ, सोनू साहू उपस्थित होते.




