– तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
कामठी :- सिकल सेल ॲनिमिया जनजागृती सप्ताह निमित्त आज तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. नागरिकांमध्ये सिकल सेलसंदर्भातील जागरूकता वाढविणे आणि लवकर निदानाद्वारे गंभीर परिणाम टाळणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
शिबिराला वैद्यकीय अधिकारी डॉ. शबनम खानुनी, वैद्यकीय अधिकारी डॉ. हिमांश साखरे आणि पब्लिक हेल्थ मॅनेजर डॉ. सबा खान यांची मान्यवर उपस्थिती लाभली. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांनी आपली तपासणी करून घेतली व आवश्यक सल्ला मिळविला.
उपक्रमाचे उद्देश सिकल सेल आजाराचे वेळेवर निदान करणे, जनतेला योग्य आरोग्य मार्गदर्शन करणे, आवश्यक तपासण्या व समुपदेशन उपलब्ध करणे या प्रमाणे आहेत.
शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. तज्ज्ञांकडून सिकल सेलची लक्षणे, धोके, प्रतिबंध आणि उपचार पद्धती याबाबत माहिती देण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान अधिकाऱ्यांनी संदेश दिला की, आरोग्य जागरूकतेतूनच निरोगी समाजाची निर्मिती शक्य आहे.
याच पार्श्वभूमीवर एन यू एच एम कामठी तर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, सिकल सेल तपासणी करून घ्या आणि स्वतःचे तसेच आपल्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित ठेवा.




