spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

घरकुल लाभार्थ्यांना रेती ऊपलब्ध करुन द्या – सावनेर तालुका सरपंच संघटनेची मागणी

खापा :- तालुक्यातील रेतीघाट बंद असल्यामुळे शासनाकडुन सावनेर तालुक्यात मंजुर झालेले घरकुल बांधकाम रेती अभावी रखडले आहे. अशा घरकुल लाभार्थ्यांना शासनाकडुन मोफत देण्यात येणारी पाच ब्रास रेती त्वरित ऊपलब्ध करून देण्यात यावी. अशी मागणी सावनेर तालुका सरपंच संघटनेकडुन करण्यात आली असुन या मागणीचे निवेदन सरपंच परिषदेचे नागपुर जिल्हाध्यक्ष किशोर गणविर यांच्या नेतृत्वात सावनेर तहसीलदार यांना देण्यात आले.

सावनेर तालुक्यातील रेतीघाट बंद असल्याने रेतीअभावी घरकुलाची कामे रखडली आहे. रेती मिळत नसल्याने बांधकाम कसे करावे हा बिकट प्रश्न घरकुल लाभार्थ्यांना पडला आहे. रेती अभावी तालुक्यातील मंजूर घरकुलाचे बांधकाम काही गावात अर्धवट तर, काही घरकुलाच्या बांधकामास अजुनही सुरूवात करण्यात आलेली नाही. शासनाकडुन पाच ब्रास रेती उपलब्ध करून दिल्या जात असतांना रेती घाट बंद असल्यामुळे महागडी रेती घरकुल लाभार्थ्यांना विकत घेणे हे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे. त्यामुळे तालुक्यातील शेकडोच्या संख्येने घरकुलांचे बांधकाम अपुर्ण आहे. घरकुल लाभार्थ्यांना त्यांच्या परिसरातील जवळ असलेल्या रेती घाटावरूनज घरकुल बांधकामाकरिता मिळणारी रेती उपलब्ध करून देण्यात यावी. अशी मागणी सावनेर तालुका सरपंच परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन सावनेर तहसीलदार यांना देण्यात आले.

याप्रसंगी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष किशोर गणविर, सावनेर तालुका महासचिव अनेश रोकडे सरपंच बिचवा, अशोक डवरे तालुका कोषाध्यक्ष सरपंच सावंगी हेटी, होमेश्वर पानपते सरपंच ब्रम्हपुरी, अंजु ललीत चौरेवार सरपंच किरणापुर, दिपाली ठाकरे सरपंच नागलवाडी, हरिश चौधरी उपसरपंच कोथुळणा, सचिन गजभिये सरपंच खैरी (पंजाबराव), राहुल भुसारी उपसरपंच, शिवशंकर टोंगे सरपंच जोगा आदिंची उपस्थिती होती.

Popular Articles