spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मोर्शी येथे होमगार्ड वर्धापन दिन उत्साहात साजरा ! 

– पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी होमगार्ड सैनिकांनी केले वृक्षारोपण ! 

मोर्शी :- मोर्शी येथे होमगार्ड पथकातर्फे ७९ वा होमगार्ड वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. होमगार्ड वर्धापन दिनानिमित्त मोर्शी पथकामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन मा.जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत ( भा.पो.से.) यांचे आदेशाने व केंद्रनायक दिपक राजपुत यांचे मार्गदर्शनात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

१४ डिसेंबर रोजी मोर्शी पथकामध्ये साप्ताहिक परेड घेऊन. संपूर्ण परिसर स्वच्छता करण्यात आले त्यानंतर वृक्षारोपण करण्यात आले. पी एस आय पवार साहेब, ए एस आय गुल्हाने साहेब यांनी रॅलीला हिरवी झंडी दाखवून मोर्शी शहरात पायदळ रॅली काढण्यात आली. रॅली मध्ये होमगार्ड संघटनेबद्दल जनजागृती करण्यात आली.

होमगार्ड सैनिकांनी कोरोना काळात कर्तव्य करून शासनाला मोलाचे सहकार्य केले. कायदा व सुव्यवस्था निवडणुका सार्वजनिक उत्सव बंदोबस्त होमगार्ड फार चांगल्या जबाबदारीने कर्तव्य बजावतात. होमगार्डच्या कार्याची प्रशंसा करत सर्व मान्यवरांनी होमगार्ड सेवा ही पोलिसांचे सच्चे साथीदार असल्याचे तालुका समदेशक मनोज कटोलकर यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले त्यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात होमगार्ड सैनिकांच्या कर्तव्याचे कौतुकास्पद अभिनंदन करून होमगार्ड सैनिकांना होमगार्ड वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक फलटण नायक गणेश बागल यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सार्जंट प्रफुल जानराव व फलटण नायक गणेश बागल, सागर काळे तसेच पथकातील पुरुष व महिला होमगार्ड यांची उपस्थिती लाभली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी मोर्शी पथकातील पुरुष व महिला होमगार्ड सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles