spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राज्यातील एलएचव्ही व आरोग्य सेविकांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा; प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे डॉ.अंबाडेकर संचालकांचे आश्वासन

नागपूर :- राज्यातील एलएचव्ही, आरोग्य सेविका व अन्य संवर्गांच्या प्रलंबित मागण्यांबाबत राज्य आरोग्य संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी अधिवेशन काळात नागपूर येथे राज्याचे सार्वजनिक आरोग्य सेवा विभागाचे संचालक डॉ. अंबाडेकर यांना दि. १३ डिसेंबर रोजी निवेदन सादर केले. निवेदनातील मुद्द्यांवर चर्चा करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देत राज्य आरोग्य कृती समितीचे सर्व प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे आश्वासन संचालकांनी दिले.

यावेळी संचालकांचे सोबत चर्चेत निवेदकर्त्या पुष्पा वानखडे, चंदा बेलसरे, दिपाली शिंदे, पद्मा जाधव, सुनंदा नाथे, मोनिका भोवते, सुरेखा उके, लक्ष्मी बनसोड, पूनम नांदुरकर, निकिता गणवीर, सुजाता बनसोड, वीणा चव्हाण, संगीता लोखंडे, पार्वती चाचूरकर, कुंदा गादे, मीरा भास्करे, शिल्पा बन व मंगला पडोळे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. बैठकीचा समन्वय उमेश ढोणे यांनी पुढाकार घेतला.

Popular Articles