खापा :-तालुक्यातील कोदेगाव येथे अनंत भुषित जगतगुरु नरेंद्र महाराज संस्थान नानिज धाम यांच्या आदेशानुसार सावनेर तालुक्यातील कोदेगाव येथे बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली. तालुका अध्यक्ष उमेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या बंधाऱ्यात साचलेल्या पाण्यामुळे परिसरातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागणार आहे. या उद्देशाने पाणी आडवा पाणी जिरवा हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमासाठी तालुक्यातील भक्त व भगिनी यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
यावेळी प्रामुख्याने पिलाजी खोरगडे, चंदु सातपुते, विठ्ठल मिरासे, गंगा वरखडे, गोपाल वरखडे, संगिता भलावी, सुनिल भलावी, अनिल भलावी, भुजंग भिंगारे, नरेंद्र आष्टणकर, संजय हिवरकर, देवा मदनकर, पुरुषोत्तम नागपुरकर, प्रशांत बारापात्रे, हेमलता आष्टणकर, वंदना ठमके, माधुरी भिंगारे, शिला उमक, मधुकर चौधरी व तालुक्यातील भक्तगण व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




