spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मानवासोबतच पशु पक्षावर प्रेम करणारे गाडगेबाबा – प्राचार्य संदीप भोंडे

खापा :- तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय सिरोंजी येथे दि. २० डिसेंबर शनिवारला राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी गाडगे बाबांचे प्रसिद्ध भजन गोपाला गोपाला देवकी वंदन गोपाला विद्यार्थ्यांनी सुरेख आवाजात संगीतमय वाद्यामध्ये गायले व त्यातून स्वच्छतेचा संदेश नागरिकांना दिला. याप्रसंगी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक काळमेघ यांनी गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी प्राध्यापक दळवी, प्राध्यापिका बुरहान, डी. जी. चौधरी, टेकाडे, बॉबी हजारे, पर्वत, दीपक नारे, तवले, दहिकर, मारुती सोमकुवर, गीता बाजनघाटे, शुभम चटकवार व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आर. बी. टेकाडे यांनी तर आभार प्रदर्शन नारे यांनी केले.

Popular Articles