– भागवत लांडगे यांच्या संकल्पनेतून जनतेला कळले संविधान – बाबुराव राऊत (वरिष्ठ पोलीस निरीक्षक)
नागपूर :- भारतीय संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 69 व महापरिनिर्वाण दिवसा निमित्ताने आयोजित भारतीय संविधानाच्या 395 कलमांचे वाचन सतत अकरा दिवस करून ज्येष्ठ पत्रकार व लेखक भागवत लांडगे यांनी वैशाली नगर चौकातून सर्व सामान्य जनतेला संविधान आम जनतेसाठी किती मोलाचे आहे हे त्यांनी वाचून व याप्रसंगी कलमांची किचकट भाषा सोपी करून संविधानाला वाचून काढले. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यातील वाचनीय कृतींची दाद घ्यायला हवी. असे म्हणतानाच राऊत सरांनी या उपक्रमाचे स्वागत केले. स्वतः बाबुराव राऊत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणापूर्वी भारतीय संविधानाची 375 ते 395 चे कलमांचे उपस्थित जनतेसमोर वाचन करून संविधान वाचण्याचा शेवट केला. आज 368 कलमापासून वाचन करून भागवत लांडगे यांनी कलम 375 पर्यंत वाचन केले असतांनाच राऊत यांनी संविधान वाचनाची उत्सुकता जागृत झाली आणि त्यांनी 368 ते 395 कलमांचा वाचून कलमांना वाचून सांगता केली. हे या समारोपीय कार्यक्रमाची विशेष बाब ठरली. दुसरे वक्ते जितेंद्र घोडेस्वार बसपा नेते यांनी देखील लांडगे यांच्या संविधान वाचण्याच्या कार्यक्रमाची प्रशंसा केली आणि संविधानामुळे देशाचा कारभार सुरू असल्याचे सांगितले. भारतीय संविधानाच्या वाचनाचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी वैशाली चौकातील समता सैनिक दलाच्या फलकाला समता सैनिक दलाच्या पंचशील सुजातानगर महिला तुकडीने पुष्पहार अर्पण करून सलामी दिली. नंतर या तुकडीने समोरच्या पिंपळाच्या बोधी वृक्षाला साकडे घालून तिथे ठेवलेल्या डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भागवत लांडगे यांनी बुद्ध वंदना घेतली व मेणबत्तीने वृक्षाला अभिवादन केले. याप्रसंगी समता सैनिक दलाचे कमांडर विश्वास पाटील यांनी संचालन केले. त्यांनंतर वाचन स्थळाकडे या समता सैनिक दलाच्या तुकडीने प्रस्थान करून शांतचित्ताने भारतीय संविधान वाचनाचा आस्वाद घेतला. डॉ बाबासाहेब आंबेडकर . महापरिनिर्वाण असल्यामुळे त्या महामानवास आदरांजली वाहिली. तब्बल दोन तासाच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आनंद अंबादे यांच्या कवितेने बाबासाहेबांच्या जीवनातील आशय कळला तर बशिरभाई यांनी देखील या स्तुत्य उपक्रमाला जनतेने साथ देण्याची गरज व्यक्त केली. भारतीय संविधान वाचनाच्या कार्यक्रमाला ज्या ज्या मान्यवरांनी साथ दिली. त्या सर्वांचे लांडगे यांनी ऋण व्यक्त केले. मैत्रेय डेव्हलपर्सचे अजय पाटील, शेषराव गणवीर, बबन जांभुळकर, मधुकर ठवरे, शब्बीर, गजानन मडकेसह, सुमेध लांडगे व त्यांचे सहकारी मित्र बाळू वाघमारे, विनय वाघमारे, इत्यादींची मोलांची साथ लाभली. असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे ज्येष्ठ पत्रकार संविधान वाचक भागवत लांडगे यांनी कळविले आहे.




