नागपूर :- आकाशवाणी नागपूरच्या ग्रामीण कार्यक्रम सल्लावर समिती ची बैठक मंगळवार २३ डिसेंबर रोजी आकाशवाणी सभागृहात संपन्न झाली. या बैठकीत आगामी जानेवारी फेब्रुवारी मार्च २०२६ या तिमाहीत प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांना मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आकाशवाणी नागपूर चे सहायक केंद्र निदेशक (कार्यक्रम )विजयसिंग राजपूत उपस्थित होते. या तिमाहीत प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाविषयी सचिन लाडोळे, कार्यक्रम अधिकारी आकाशवाणी यांनी माहिती दिली. शासनाच्या विविध योजनांची माहिती, येणारा उन्हाळी हंगाम लक्ष्यात घेता विविध कार्यक्रम,कृषी, वन, रेशीम, पशुसंवर्धन, मत्स आदी कार्यक्रमांवर भर देण्यात येईल असे त्यांनी या प्रसंगी सांगितले.
या बैठकीत डॉ गजानन खडसे, मुख्य वैज्ञानिक निरी , रवींद्र मनोहरे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नागपूर, डॉ महेंद्र ढवळे उप संचालक रेशीम विभाग नागपूर, डॉ सारीपुत्त लांडगे प्रमुख कृषी विज्ञान केंद्र माफसू , डॉ वैशाली बांठिया ,विभाग प्रमुख नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय, डॉ हर्षा मेंढे सहायक प्राध्यापक कृषी महाविद्यालय नागपूर ,दिनेश नानवरे सामाजिक वनीकरण नागपूर आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व सदस्यांनी आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या कृषी आणि गृह विभागाच्या वतीने प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाविषयी समाधान व्यक्त केले आणि काही नवीन कार्यक्रम प्रसारित करण्याविषयी सूचना मांडल्या. सभेचे अध्यक्ष विजयसिंग राजपूत यांनी या कार्यक्रमाची अंबलबजावणी केली जाईल असे सांगितले आणि आकाशवाणी चे राजस्व वाढविण्याच्या दृष्टीने सर्व विभागणी सहकार्य करण्याचे आवाहन या प्रसंगी केले.








