नागपुर :- नविन वर्षानिमीत्त नागपुर ग्रामीण जिल्हयात राबविण्यात येणाऱ्या विशेष मोहीमे अंतर्गत दिनांक २५/१२/२०२५ रोजी मोटार वाहन कायदा कलम १८५ अन्वये ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह च्या ६६ कारवाई, तसेच विना हेल्मेट, विना परवाना, ओव्हर स्पीडच्या आणि इतर २३१ कारवाई अशा एकुण २९७ कारवाई केल्या आहे.
त्याचप्रमाणे सदर विशेष मोहीमे अंतर्गत दिनांक २५/१२/२०२५ रोजी अवैध दारू विक्रेते, दारू काढणारे तसेच सेवन कारणाऱ्यांवर कारवाई करत महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम अन्वये विविध पोलीस स्टेशन अंतर्गत एकुण २७ गुन्हे नोंद करण्यात आले असुन सदर कारवाईत १३८६० मिली देशी दारु, २४८ लीटर मोहाफुल दारू, १४२० लीटर मोहाफुल सडवा तसेच इतर साहीत्य असा एकुण ८४,८४०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करून एकुण २७आरोपी याविरूद्ध गुन्हे नोंद करण्यात आलेले आहे. नाशवंत मुद्देमाल पंचनामा कारवाई करून नष्ट करण्यात आला आहे.
मद्यप्राशन करून वाहन चालवितांना चालक मिळून आल्यास त्यांच्यावर मोटार वाहन कायदया अन्वये कारवाई करण्यात येईल सदर प्रकरणात मा न्यायालयाकडुन १०,०००/- रूपयांपर्यंत दंड होवु शकतो. नागपूर ग्रामीण जिल्हा पोलीस दलातर्फे संपुर्ण जिल्हयातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, नववर्ष, तसेच इतर सणोत्सव आनंदात साजरा करावा परंतु स्वसुरक्षा म्हणुन वाहन चालवितांना मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, हेल्मेट चा वापर करावा, वाहतुक नियमांचे पालन करावे.








