spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जि. प. हायस्कूल कोदामेंढी येथे माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे भव्य आयोजन

किशोर साहू, मौदा, दि. २९ :- जि प हायस्कूल येथे शनिवार( दि. २७ डिसेंबर) ला माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. अनेक वर्षांनंतर जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी यावेळी शाळेप्रती आपले ऋण व्यक्त करत ‘माजी विद्यार्थी संघा’ची अधिकृतपणे स्थापना केली.

कार्यक्रमाचे उदघाटन शाळेचे प्राचार्य सी. एस. शिवणकर यांनी दीप प्रज्ज्वलन करून केले. यावेळी माजी प्राध्यापक बी. जे. पाटील, मुळे , निखाडे, वंजारी, ढोबळे, श्रीमती राठोड उपस्थित होते.

सन 2007-08 या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते. केवळ स्नेहसंमेलना पुरते कार्यक्रम न राहता शाळेप्रती कृतज्ञता म्हणून शाळेच्या विकासासाठी मदत करण्याचे आश्वासन सर्व माजी विद्यार्थ्यांनी दिले.

Popular Articles