spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नारायण टेकडीवर नारायण स्वामी पुण्यतिथी महोत्सवाची सांगता

– पुण्यतिथीच्या महोत्सवात धार्मिक वातावरण 

– देशभरातून साधक व भाविकांची उपस्थिती 

सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- अंबाळा परिसरातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या नारायण टेकडीवर श्री सद्‌गुरू नारायण स्वामी व श्री दत्तगुरू बालयोगी छोटूबाबा यांचा नऊ दिवसीय पुण्यतिथी महोत्सव १८ ते २६ डिसेंबर दरम्यान विविध धार्मिक, सामाजिक व आध्यात्मिक कार्यक्रमांनी साजरा करून महोत्सवाच्या लाभ भक्तांनी घेतला.

महोत्सवाची सुरुवात (दि.१८) डिसेंबर रोजी येथील अंबाळा परिसरातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ नारायण टेकडी व महोत्सवाची सुरुवात साध्वी महाराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. नारायण टेकडीवर सुमारे ५०० वर्षांपूर्वीची श्री सद्‌गुरू नारायण स्वामी यांची संजीवनी समाधी आहे. भाविकांची दर्शनासाठी येथे वर्षभर मोठी गर्दी असते. महोत्सवाच्या काळात दररोज सकाळी ९ वाजता समाधी अभिषेक, नऊ दिवस ‘ॐ नमो नारायण’ या संगीतमय अखंड नामजपाचे आयोजन करण्यात आले. सकाळी ११ वाजता भाविकांसाठी निःशुल्क रोगनिदान शिबिर, दररोज सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत महाप्रसादाची व्यवस्था होती. विशेष म्हणजे प्रतिदिन महाप्रसाद सेवकानी स्वतः तयार करून स्वहसते वितरण केले. नऊ दिवस चालणाऱ्या या पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप शुक्रवार (दि.२६) डिसेंबर रोजी गोपालकाल्याने करण्यात आला. या महोत्सवात जिल्ह्यासह राज्यातील तसेच देशातील विविध भागांतून मोठ्या संख्येने साधक-भाविक दर्शनासाठी उपस्थित होते. यावेळी नागपुरचे राजे भोसले, रामटेक चे नवनिर्वाचित नगर परिषद अध्यक्ष बिकेन्द्र महाजन शहित अनेक मान्यवराणी हजेरी लावली. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सुश्री साध्वीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो साधक व सेवकानी परिश्रम घेतले आहेत.

Popular Articles