उमरेड :- उमरेड हद्दीत आरोपी नामे नितेश किसन ठाकरे, वय ३१ वर्ष याने जुन्या वादाचे कारणावरून फिर्यादी नामे सौ. स्मिता पंकज जुमडे, वय ३६ वर्ष, रा. मंगळवारी पेठ, वनिता शाळेच्या मागे उमरेड, जि. नागपूर यांची आई नामे श्रीमती पार्वताबाई शंकर फुकट, वय ६५ वर्ष व फिर्यादीची मोठी बहीण नामे सौ. संगिता वसंता रिठे, वय ४१ वर्ष, दोन्ही रा. गांगापुर उमरेड यांच्या राहते घरी जावुन भांडण केले व फिर्यादीची आई व बहिण यांच्या डोक्यावर लाकडी दांडयाने जबर प्रहार करून त्यांना जिवानीशी ठार करून आरोपी घटनास्थळावरून पळुन गेला. अशा फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपीविरूद्ध पोस्टे उमरेड येथे खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला.
नमुद गुन्हयातील आरोपी नामे नितेश किसन ठाकरे, वय ३१ वर्ष याचा शोध उमरेड पोलीस घेत असता उमरेड पोलीस यांनी तांत्रिक पुरावे आणि गुप्त बातमीदारांच्या मार्फतीने आरोपीचा शोध घेत अवघ्या ०१ तासाच्या आत आरोपीचा शोध घेवुन त्याला दिनांक २७/१२/२०२५ रोजी गांगापूर परीसरातुन ताब्यात घेतले. आरोपीकडुन गुन्हयात वापरलेले हत्यार जप्त करण्यात आलेला आहे.








