पारशिवनी :- पारशिवनी तालुक्यातील सावळी येथिल इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर पार्क करुन ठेवलेला गिट्टीने भरलेला टाटा कंपनीचा बारा चक्का टिप्पर क्रमांक MΗ 40 DB 7711 तेथुन दिनांक २५/१२/२०२५ च्या पहाटे एक-दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरी करुन नेला. सदर प्रकरणी फिर्यादी नामे अंकित किसन घंगारे, वय २९ वर्ष, रा. घाटकुकडा, ता. पारशिवनी सध्या रा. पारशिवनी यांच्या तकारीवरुन पारशिवनी पोलीस ठाणे येथे अप क. ६११/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरु होता.
गुन्हा दाखल होताच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये पोलीस स्टेशन पारशिवनी येथील पथकाने आरोपीचा कसून शोध घेणे सुरू केले व महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली अशा पाच पेक्षा जास्त राज्यांमध्ये आरोपी व चोरीस गेलेल्या ट्रकचा शोध घेत सतत खापा, सावनेर, बैतुल, वैसरवाडा, कनोद, आष्टा, देवास, इंदौर, उजैन, बुंदी, दौसा, दिल्ली, नूह असा प्रवास करून मार्गातील एकुण ३५ टोलनाक्यावरील अंदाजे २०० सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासुन तसेच तांत्रिक पुराव्याच्या आधारे मिळालेल्या माहितीवरून पारशिवनी पोलीस हरियाणा येथील पडवल जिल्ह्या पर्यंत पोहोचल्यानंतर नागपूर ग्रामीण जिल्हयाचे वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हरियाणा राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ संपर्क करून पारशिवनी पोलीस पथक तसेच हरियाणा येथील CIA पथकाच्या माध्यमाने पोलीस स्टेशन हातिनच्या हद्दीमधुन आरोपी नामे प्रदीप जगदीश सासही, वय ३० वर्ष, रा. सुलचानी, ता. नारनौंद कपेज हिस्सार याचे कडून गुन्ह्यात चोरीस गेलेला १२ चक्का टिप्पर ट्रक क्रमांक MH 40 DB 7711 हस्तगत केला.




