spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विठ्ठलनगरात 13 जेष्ठ नागरिकांचा सामूहिक वाढदिवस संपन्न

नागपूर :- जेष्ठ नागरिक समिति विठ्ठलनगर तर्फे दर महिन्याच्या शेवटच्या आठवडयात सामूहिक वाढदिवस साजरा करण्यात येतो माहे डिसेंबर मध्ये शनिवारी २७ डिसेंबर रोजी जेष्ठ नागरिकांचा सामूहिक वाढदिवस सार्वजनिक हनुमान मंदिर विठ्ठलनगरच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. यावेळी सत्कारमूर्ति विश्वनाथ केळवदे, ॲड.अशोक रेवतकर, अरुण परचंड, गजानन रामटेककर, शंकर लांभाते, दामोधर खड़गी, विनायक आसटकर, प्रभाकर बगड़े सुरेश पटले, मनोहर मड़घे रेखाताई देशकर, मीना मेहता, शोभा तांदुळकर, यांचे फूल व शाल देऊन सत्कार करण्यात आला.

जेष्ठ नागरिकांच्या वाढदिवसानिमित्य क्रिष्णकांत शास्त्री यांनी मंत्रोपचाराने आपले पुढील आयुष्य कसे सुखमय करता येते याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रेमदास नंदनवार, उपाध्यक्ष केवलराम पटोले, प्रमुख पाहुने किशोर मेश्राम हे होते. सामाजिक कार्यकर्त्ता प्रवीण ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले. सदरचा कार्यक्रम हा शेवटचा असल्याने कार्यक्रम अतिशय आनंदित आणि उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमांचे संचालन शामराव गोमासे यांनी तर कार्यक्रमाचे समापन नारायण माने यांनी केले. अरुण परचंड यांनी वाढदिवसानिमित्य स्वतः भोजनाचा पूर्ण खर्च केला हे विशेष. सर्वांनी जेवनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी योगीराज ठाकुर, विनायक सेलुकर अरुण परचंड, मनोहर मड़घे, प्रमोद झुरमुरे यांनी परिश्रम घेतले.

Popular Articles