spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

रंग, सुगंध अन् सौंदर्याने बहरणार नववर्षाची पहाट

– १ जानेवारी पासून मनपाचा ‘पुष्पोत्सव २०२६’

– नववर्षाच्या स्वागतासाठी १ ते ४ जानेवारी फुलांचा महोत्सव

नागपूर :- नागरिकांच्या जीवनात निसर्गाचा स्पर्श, रंगांची उधळण आणि फुलांच्या सुगंधाचा दरवळ निर्माण करण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकातर्फे रंग, सुगंध आणि सौंदर्याचा महोत्सव ‘पुष्पोत्सव २०२६’ आयोजित करण्यात येत आहे. हा पुष्पोत्सव गुरूवार १ जानेवारी ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत शहरातील दहा उद्यानांमध्ये आयोजित करण्यात येणार असून, उद्यानांच्या रोजच्या वेळेनुसार नागरिकांना या उत्सवाचा आनंद घेता येणार आहे. विशेष म्हणजे, मनपाच्या पुष्पोत्सव प्रदर्शनाचे हे तिसरे वर्षे आहे.

नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या या पुष्पोत्सवात शहरातील विविध उद्याने विशेष संकल्पनांवर सजविण्यात येणार आहेत. थीम मध्ये १३ प्रकारचे शेवंती,रेम्बो,बोगनवेलिया, सुगंधी असून रंगीबेरंगी फुले, आकर्षक पुष्परचना व यांचा सुरेख संगम या उत्सवात अनुभवता येणार आहे. तसेच या पुष्पोत्सवामध्ये टाकाऊ पदार्थांपासून तयार केलेल्या साहित्याचा वापर करून फुलांची व सजावटीची रचना करण्यात येत असून सेल्फी पॉईंट्स, कृत्रिम धबधबाची उभारणी केली आहे. ‘वेस्ट टू वंडर’ या संकल्पनेवर आधारित सजावट, पुनर्वापरयोग्य साहित्य, पर्यावरणस्नेही घटकांचा वापर करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश प्रभावीपणे दिला जाणार आहे.

“नागरिकांना निसर्गाशी जोडणे, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणे व उद्यानांचे सौंदर्य अधिक खुलविणे हा या पुष्पोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. अत्यंत कष्टाने आणि कल्पकतेने हे प्रदर्शन सजविण्यात आले आहे. नागपूरकरांनी याचा आनंद घ्यावा” असे आवाहन नागपूर महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी केले. अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांच्या मार्गदर्शनात उद्यान विभागाच्या चमूद्वारे यांची तयारी केली जात आहे

झोननिहाय उद्यानांचे ठिकाण व थीम पुढीलप्रमाणे –

लक्ष्मी नगर झोन – १) : सुर्वेनगर उद्यान- शेवंती थीम

धरमपेठ झोन – २ : शिवाजीनगर उद्यान- रेम्बो थीम

हनुमान नगर झोन – ३ : त्रिशताब्दी उद्यान- बोगनवेलिया थीम

धंतोली झोन – ४ : महात्मा फुले उद्यान, सुयोगनगर-पिटूनिया थीम

नेहरू नगर झोन – ५ : संत ज्ञानेश्वर उद्यान, दत्तात्रयनगर- सुगंधी थीम

गांधी महाल झोन – ६ : गांधीबाग उद्यान- स्वच्छता थीम

सतरंजीपुरा झोन – ७ : तुळशीनगर उद्यान- मेसज इन Flower

लकडगंज झोन – ८ : लता मंगेशकर उद्यान- मिक्स Flower थीम

आशी नगर झोन – ९ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, वैशालीनगर- रोझ थीम

मंगळवारी झोन – १० : मंगळवारी उद्यान- Cactus & Bonsia थीम

दरवर्षी हा उत्सव एका विशिष्ट संकल्पनेवर आधारित असतो. यंदाच्या पुष्पोत्सवात भारतातील राष्ट्रीय प्रतिके पानाफुलांनी साकारण्यात येणार आहे. त्यामुळे मनोरंजनासह नागपूरकरांना ज्ञानातही यामुळे भर पडणार आहे, अशी माहिती उद्यान विभागाद्वारे देण्यात आली.

नागपूर पुष्पोत्सवाची विशेषत म्हणजे आपल्याला एकाच छताखाली वेगवेगळ्या रंगांची, सुगंधाची फुलझाडे पहावयास मिळतात. त्यासाठी नागपूर महानगरपालिकेचा उद्यान विभाग विशेष परिश्रम घेत असतो. रोपांची लागवड, त्यांची निगा राखणे, त्यांची सजावट करणे आदी गोष्टींवर उद्यान विभागाचे अधिकारी-कर्मचारी लक्ष ठेवून असतात.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.