किशोर साहू, मौदा, ता. 30 :- गुरुवार ( दि. 25 डिसेंबर)ला तहसील कार्यालय मौदा येथे श्रावणबाळ व संजय गांधी निराधार समितीची सभा समितीचे अध्यक्ष रामेश्वर लिचडे यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व सदस्यांच्या उपस्थितीत पार पडली. पात्र अपंग, निराधार व वयोवृद्ध तसेच विधवा महिला लाभार्थ्यांचे प्रकरणे मंजूर करून न्याय देण्याचे काम सभेत करण्यात आले.
याप्रसंगी समितीचे सचिव नायब तहसीलदार दराडे, सदस्यगण तालुका शिवसेनाप्रमुख प्रशांत भुरे, बोरी (घिवारी) सरपंच विशाल सेलोकर, तारसा उपसरपंच चंद्रशेखर गभने, अरोली ग्रामपंचायत सदस्य रोशन उमप सह इतरही सदस्यगण उपस्थित होते.








