spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बारशी येथे कृषी समूह सहायक पदी निवड झाल्याबद्दल युवतीचा ग्रा पं व ग्रामस्थांतर्फे सत्कार

किशोर साहू, मौदा ,ता. 30 :- गट ग्रामपंचायत दुधाळा (बारशी) अंतर्गत येणाऱ्या बारशी येथील युवती पायल धर्मराजजी झलके ची कृषी समूह सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल ग्रा पं व ग्रामस्थांकडून तिला भेटवस्तू देऊन तिच्या सत्कार करून अभिनंदन करण्यात आले व पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी सरपंच ग्रा. पं. दुधाळा उमेश झलके, विजय झलके, धर्मराज झलके, वेणू झलके, शारदा झलके, दामोधर हिवसे, राजकुमार झलके, सुरेश हीवसे, कमलाकर झलके, हिरामण डडमल, योगेश वाहाणे, मधुकर हिवसे, भारत लोंढेकर, नरेश झलके, अजय झलके, आकाश इंगळे सह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Popular Articles