spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

क्षण अभिमानाच्या : नागपूर जिल्ह्यातील नवनिर्वाचित अध्यक्षांच्या सन्मान सोहळा

सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- लोकमत समूहाच्या वतीने नागपूर जिल्ह्यातील नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा भव्य सत्कार-सन्मान सोहळा लोकमत भवन नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला लोकमत समूहाचे सर्वेसर्वा विजय दर्डा प्रमुख उपस्थित असून नागपूर जिल्ह्यातील सर्व नगराध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. भाषणात विजयजी दर्डा यांनी रामटेकचा विशेष उल्लेख करत प्रभू श्रीरामाचे पावन मंदिर, महाकवी कालिदासांची मेघदूत व अभिज्ञान शाकुंतलम् यांसारखी अमूल्य महाकाव्य रचना साहित्यपरंपरा, रामटेकचे ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक महत्त्व या सर्व बाबींवर प्रकाश टाकला. माझ्या सत्कार प्रसंगी रामटेकच्या या वैभवशाली ओळखीचा मोठ्या प्रमाणात प्रसार-प्रचार कसा करता येईल, यावर विशेष चर्चा त्यांनी केली. यावेळी राज्यमंत्री ना. आशिष जयस्वाल यांचा विशेष उल्लेख करत, “जयस्वाल म्हणजे एक डायनॅमिक व कार्यकुशल नेतृत्व असून, रामटेकला असे नेतृत्व लाभणे ही अभिमानाची बाब आहे. आणि आपण रामटेकच्या जनतेने दिलेली जबाबदारी निश्चितपणे यशस्वीरीत्या पार पाडाल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला” या प्रसंगी रामटेक नगरीला भेट देण्याचे निमंत्रण देखील मान्यवरांना देण्यात आले. या सन्मानासाठी लोकमत समूहाचे विजय दर्डा यांचे तसेच सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले.

Popular Articles