spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महाराष्ट्रातील फाउंडेशन पुरस्कारासाठी प्रा.जावेद पाशा यांचा सत्कार आज

नागपूर :- नागपुरातील प्रसिद्ध साहित्यिक, कवी आणि विचारवंत प्रा. जावेद पाशा कुरेशी यांना 2025 चा “महाराष्ट्र फाउंडेशन” चा अत्यंत मानाचा “सामाजिक कार्यकर्ता – संघर्ष” हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. प्रा.जावेद पाशा यांची 40 पुस्तके प्रकाशित असून संपूर्ण महाराष्ट्राला प्रबोधनकार, विचारवंत आणि उत्कृष्ट वक्ते म्हणून त्यांची ओळख आहे. ते सहा राज्यस्तरीय आणि दोन राष्ट्रीय स्तरावरच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. अनेक सामाजिक चळवळीचे प्रवक्ते आणि फुले शाहू आंबेडकरी आंदोलनातील अत्यंत सन्मानीय मान्यवर म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे चळवळीत समर्पितपणे कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळालेले आहे. पुरस्काराच्या रुपाने सन्मानचिन्ह आणि रोख पन्नास हजार प्रदान करण्यात येत असून पुरस्कार सोहळा 17 जानेवारीला एस एम सभागृह, पुणे येथे एका भव्य समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. प्रा.जावेद पाशा कुरेशी यांना मिळालेल्या या पुरस्काराने त्यांचे काही सत्कार उद्या गुरुवार 1 जानेवारी ला नटराज सभागृह, हिंदी मोर भवन, नागपूर येथे दुपारी दीड वाजता “मूल्यसंगर साहित्य विचार मंच” द्वारा करण्यात येत असून कार्यक्रमाची अध्यक्षता प्रसिद्ध साहित्यिक ई.मो. नारनवरे करीत आहेत. प्रमुख अतिथी सुदर्शन पाणतोडे राहणार असून माणिकराव खोब्रागडे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. सूत्र संचालन संजय गोडघाटे आणि रंगराज गोस्वामी करणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ प्रकाश राठोड, डॉ मनोहर नाईक, डॉ महेंद्रकुमार मेश्राम, डॉ भोला सरवर, डॉ भूषण भस्मे, प्रभू राजगडकर, डॉ विनोद राऊत, प्रसेनजीत गायकवाड उपस्थित राहणार आहेत.

Popular Articles