spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मनपा अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समिती गठीत

– निवडणूकी दरम्यान आढललेल्या रोकड रक्कमेवर समिती घेणार निर्णय

नागपूर :- नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी लागू असणाऱ्या आदर्श आचारसंहिता काळात कागदपत्रांशिवाय निर्धारित रक्कमेपेक्षा जास्त रोख रक्कम बाळगणाऱ्यांसह आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर मनपाच्या आचारसंहिता कक्षाच्या भरारी पथकासह (एफएसटी) आणि स्थिर निगराणी पथकाद्वारे (एसएसटी) कारवाई केली जात आहे. कारवाई दरम्यान पथकांद्वारे विविध ठिकाणी रोकड व इतर अनुषंगिक वस्तूंची जप्त केली जात असून, कक्षाकडून जप्त करण्यात आलेल्या वस्तूंच्या विल्हेवाटीसाठी मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार मनपाच्या अतिरिक्त आयुक्त तथा आचारसंहिता नियंत्रण अधिकारी वैष्णवी बी. यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे.

समितीत उपजिल्हाधिकारी तथा आचार संहिता कक्ष प्रमुख विजय पवार यांची सदस्य म्हणून तर, मनपाचे प्रमुख लेखा व वित्त अधिकारी तथा खर्च देखरेखचे नोडल अधिकारी सदाशिव शेळके यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच समितीत सदस्य म्हणून निवडणूक खर्च कक्ष प्रमुख तथा उप मुख्य लेखा वित्त अधिकारी, जिल्हा परिषद सुरज बारापात्रे व जिल्हा कोषागार अधिकारी मोनाली भोयर यांची समिती गठीत करण्यात आली आहे.

नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ दरम्यान आचारसंहिताची प्रभावी अंमलबाजवाणी व खर्चावर नियंत्रण ठेवणे, आर्थिक बळाचा दुरुपयोग टाळणे, मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तूंच्या वाटपावर अंकुश ठेवण्याकरिता आचारसंहिता कक्ष कार्य करीत आहे. कक्षाच्या भरारी पथकासह (एफएसटी) आणि स्थिर निगराणी (एसएसटी) पथकांकडून निवडणुकी काळात वाहन तपासणी केली जात आहे. यादरम्यान निर्धारित रक्कमेपेक्षा अधिक रक्कम व अनुषंगिक वस्तू आढळल्यास संबंधिताकडून आवश्यक ती कागदपत्रे मागितली जात आहेत. संबंधित व्यक्ती कागदपत्रे व आवश्यक माहिती पुरविण्यास असमर्थ असल्यास आढळलेली रोकड थेट ताब्यात घेतली जाते. रोकड ताब्यात घेतल्यानंतर त्या रक्कमाबाबत पुढील चौकशी पोलिस आणि आयकर विभागामार्फत केली जाते. चौकशी दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या रोकड रक्कमाबाबत योग्य ती कागदपत्रे सादर केल्यास चौकशीनंतर ही रोकड व अनुषंगिक वस्तू संबंधितांना परत करण्याबाबत निर्णय गठीत संनियंत्रण समितीद्वारे घेण्यात येईल. आचारसंहिता कक्ष प्रमुख विजय पवार यांचा भ्रमणध्वनी क्र. ७९७२४९०९६८ असून, उक्त भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.