spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नगरपरिषद प्रशासनाचा प्लास्टिक व नायलॉन मांजाविरोधात धडाका; ८ किलो प्लास्टिक जप्त

– उघड्यावर कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना दंड; मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- मकर संक्रांतीचा सण जवळ येत असताना, पर्यावरणाला घातक ठरणारा नायलॉन मांजा आणि प्रतिबंधित प्लास्टिकच्या विरोधात नगरपरिषद प्रशासनाने आपली मोहीम तीव्र केली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी, १ जानेवारी २०२६ रोजी शहर परिसरात राबवलेल्या विशेष मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

या मोहिमेदरम्यान प्रशासकीय पथकाने शहरातील विविध भागांत तपासणी केली. यावेळी ४ दुकानदार सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकतानी आढळले. शहर अस्वच्छ केल्याप्रकरणी या चारही दुकानदारांवर प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे एकूण २,००० रुपयांचा दंड नगरपरिषदेने आकारला.

तसेच, जिवाघेण्या नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी असल्याने प्रशासनाने संशयित दुकानांची झडती घेतली. यामध्ये ३ दुकानांमधून प्रतिबंधित असलेले प्लास्टिकचे पतंग (अंदाजे अर्धा किलो) जप्त करण्यात आले. मात्र, या कारवाईत कुठेही नायलॉन मांजा आढळून आला नाही. याव्यतिरिक्त, संपूर्ण मोहिमेत शहराच्या विविध भागांतून एकूण ८ किलो प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या व इतर साहित्य नगरपरिषद प्रशासनाने जप्त केले आहे.

“नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळून प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच नायलॉन मांजा विक्री किंवा वापर करताना आढळल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा इशारा नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.