spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

३ जानेवारीला रामटेक च्या दिशेने पालखीचे प्रस्थान

– गजानन महाराजांच्या पालखी चे होणार ५ जानेवारीला रामनगरीत आगमण 

– गडमंदिरावर होणार विविध धार्मिक कार्यक्रम

सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- नागपूरच्या टीमकी वरून ३ जानेवारीला श्री संत गजानन महाराजांची पायदळ पालखी यात्रा निघणार असुन येत्या ४ जानेवारीला सायंकाळी नगरधन येथे तर ५ जानेवारी ला प्रख्यात रामनगरीत दाखल होणार आहे. दरम्यान रामटेकवासीयांसह नागपुर ते रामटेक अंतरावरील ठिकठिकानच्या गावातील भावीक, भक्तगण नागरीक पालखी यात्रेच्या स्वागतासाठी सज्ज राहतात. अंगात शुभ्र वस्त्र व डोक्यावर शुभ्र टोपी घातलेले शेकडो भक्तजन महाराजांच्या दीव्य पादुकांना घेऊन रामटेकला ५ जानेवारीला पोहचेल. दरम्यान सुरुवतीला शितलवाडी येथे ९ वाजता मौदा मार्गावरील शनी मंदिर येथे शनी मंदीर देवस्थान कमेटी शितलवाडी तर्फे पालखीचे भव्य स्वागत करण्यात येईल. यानंतर ११ वाजता पालखीचे शितलवाडी येथील श्री संत गजानन महाराज मंदीर येथे आगमन होईल. येथे महाप्रसाद झाल्यानंतर दोन वाजता प्रभू श्रीरामाच्या चरण कमलाने पावन झालेल्या रामनगरी (रामटेक) कडे पालकीचे प्रस्थान होईल. रामनगरीत श्री परमानंद स्वामी मठ येथे पूजा-अर्चना, आरती होवून प्रख्यात श्रीराम गडमंदिराकडे पालखीचे प्रस्थान होईल. यादिवशी रामनगरीत महिला वर्ग रस्त्या रस्त्यावर, घरापुढे, अंगणात रांगोळी काढुन पालखीप्रती आपली आस्था दर्शवितात. या रस्त्यांवरून पालखीयात्रा गडमंदिर ला पोहोचेल. येथे रात्री महाराजांच्या पालखीचे वास्तव्य राहून दुसऱ्या दिवशी गोपालकाला व महाप्रसादानंतर यात्रेचा समारोप होईल. यात्रेत सहभागी भक्तांसाठी रामटेक येथे सेवाभावी संस्था तथा नागरीकांकडून जागोजागी पाणी,चहा आणि अल्प उपहाराची व्यवस्था करण्यात येत असते.

Popular Articles