नागपूर :- महात्मा फुले शिक्षण संस्था रेशीमबाग नागपूर येथे शनिवारी 3 जानेवारीला “क्रांतिज्योती सावित्रीआई फुले जयंती” साजरी करण्यात आली. सर्वप्रथम क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या पुतळ्यांना संस्थेचे उपाध्यक्ष गुलाबराव चिचाटे व संचालिका शोभा लेकुरवाळे यांनी पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली. याप्रसंगी स्वाती सोनुले यांनी “मी सावित्री बोलतेय” ही सुंदर लघुनाटिका प्रस्तुत केली.


यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रकाश देवते, सरचिटणीस रवींद्र अंबाडकर, सहचिटणीस रमेश राऊत, थोर महापुरुषांची जयंती स्मृतिदिन समारोह समितीचे संयोजक राजेंद्र पाटील सह- संयोजक प्रा.डॉ.अभिजित पोतले, संचालक देवेंद्र काटे प्रा.पंकज कुरळकर, संचालिका प्रा.अलका झाडे, माधुरी गणोरकर संस्थेचे आजीवन सभासद शंकरराव चौधरी, बळीराम राऊत, आनंदराव बानाईत, अरुण ढाकूलकर, उज्वला पाटील, सिंधू कांडलकर, नंदा सोनुले, सीमा गाडगे, हेमा घोळसे, माया जोगे व देवराव प्रधान सह मोठ्या संख्येने समाजबांधव व भगिनी उपस्थित होते.








