खापा :- तालुका क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२५-२६ मधील स्पर्धेत जि. प. उच्च प्राथमिक शाळा, नागलवाडी येथील खेळाडूंनी दमदार कामगिरी करीत अनेक मेडल व पदकाना गवसनी घातली आहे. त्यांचे उत्कृष्ठ कला कौशल्याचे सर्वतोपरी कौतुक होत आहे.
सावनेर तालुक्यातील अकरा केंद्रातील पाचशे पेक्षा अधिक खेळाडूंनी यात सहभाग घेतला होता. सांघिक, सांस्कृतिक व वैयक्तिक खेळाचा सहभाग होता. दिनांक १ व २ जानेवारी २०२६ ला चणकापूर येथील WCL मैदानावर स्पर्धा पार पडल्या. यात विजयी संघ कळमेश्वर, लिंगा येथे होत असलेल्या विभागीय क्रिडा स्पर्धेतकरिता पात्र ठरले आहे.
आदिवासी बहूल क्षेत्रातील नागलवाडी, सिरोंजी येथील खेळाडूची चमकदार कामगिरी बघता सर्वांनी गटशिक्षणाधिकारी कश्यप सावरकर, शिक्षण विस्तार अधिकारी पुरुषोत्तम मुंडे, जनबंधू, जितेंद्र ठाकरे, केंद्रप्रमूख लिलाधर सोनवाने यांनी खेळाडूंचे मुक्तकंठाने स्तुती केली.
सरपंच दीपाली ठाकरे, उपसरपंच भारती ऊईक, शाळा व्यवस्थापन समिती चंद्रशेखर टेकाम यांनी विजयाचे श्रेय मुख्याध्यापक प्रभू कारोकार, क्रिडा शिक्षीका इंदिरा सिरसाम, शिक्षकवृन्द नंदकिशोर कदम, अक्षय डोंगरे क्रिडा मार्गदर्शक योगेश ठाकरे यांनी दिले.








