spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

घरफोडी-चोरी प्रकरणात तिघांना अटक; नागपूर पोलिसांची मोठी कारवाई, ९ गुन्हे उघड – जवळपास २ लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

कळमणा पोलिसांची कसून चौकशी; यशोधरानगर, शांतीनगर, पारडी, मौदा येथेही गुन्ह्यांची कबुली

नागपूर १६ – नागपूर शहरातील घरफोडी व वाहन चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच कळमणा पोलिसांनी एका घरफोडी प्रकरणाचा तपास करत तब्बल ९ गुन्हे उघडकीस आणले आहेत. यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने, आयफोन, दुचाकी असा जवळपास १,९९,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, यातील एक आरोपी आधीपासूनच विविध गुन्ह्यांमध्ये पाहिजे होता. फिर्यादी डॉ. जितेश श्रीराम आत्राम (वय ३९, रा. तुकाराम नगर, जुना कामठी रोड) हे २८ मे रोजी दुपारी २ ते संध्याकाळी ६ दरम्यान हॉस्पिटल ड्युटीवर व त्यांच्या कुटुंबातील सदस्य वास्तूपूजनासाठी बाहेर गेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या मागील किचनचा कडीकोंडा तोडून प्रवेश केला. चोरट्यांनी रु. ६०,००० रोख व सोन्या-चांदीचे दागिने मिळून एकूण १,२६,००० रुपयांचा ऐवज लंपास केला. कळमणा पोलिसांच्या तपास पथकाने तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे तपासादरम्यान कळमणा पोलिसांनी तांत्रिक आधारे आणि गुप्त खात्रीशीर माहितीवरून तीन आरोपींना ताब्यात घेतले  १ )तौसिफ उर्फ घोडा आसीफ खान (वय ३२, रा. चित्रशाळा नगर, कळमणा २ ) अब्दुल ईमरान अब्दुल अकील (वय ३०, रा. राजीव गांधी नगर, यशोधरानगर ३) मोहम्मद आरीफ उर्फ बंगाली मोहम्मद मिजान शेख (वय २८, रा. हस्तिनापूर, कळमणा)   यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी कळमणा हद्दीतील त्यांनी डॉ. आत्राम यांच्या घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. पुढील सखोल चौकशीत या टोळीने कळमणा हद्दीत ३, यशोधरानगरमध्ये २, शांतीनगर, गिट्टीखदान, पारडी व मौदा येथे प्रत्येकी १ अशा एकूण ९ गुन्ह्यांची कबुली दिली. सदर आरोपी मोहम्मद आरीफ उर्फ बंगाली हा कळमणा पोलीस ठाण्यातील दोन घरफोडी व एक एनडीपीएस प्रकरण, तसेच यशोधरानगरमधील जबरी चोरीच्या गुन्ह्यात पाहिजे आरोपी आहे. तिघांच्या ताब्यातून सोन्या-चांदीचे दागिने, आयफोन, आणि हिरो होंडा स्प्लेंडर (MH-40-AD-9004) अशी एकूण १,९९,६०० रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. पोलिसांनी यामध्ये आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त रविन्द्रकुमार सिंगल, सह पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, अपर पोलिस आयुक्त (उत्तर) राजेंद्र दाभाडे, उप पोलिस आयुक्त (परिमंडळ ५) निकेतन कदम, सहाय्यक पोलिस आयुक्त (कामठी विभाग) विशाल क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनात, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत मुसळे, सहा. फौजदार बाळा सकोरे, पोहवा. विशाल भैसारे, पो. अं. वसीम देसाई, ललित शेंडे, अविनाश ग्वालवंशी आणि अजय गटलेवार या अधिकाऱ्यांनी केली.

Popular Articles