खापा :- दत्त मंदिर सेवा केंद्र, नंदापुर सेवा केंद्र व चारगाव आरती केंद्र यांच्या वतीने माळीपुरा येथील शिव मंदिर येथे रक्तदान शिबीर पार पडले. जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थेच्या उपक्रमांतर्गत हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. त्यानुसार खापा येथे राबविण्यात आला असुन येथे १११ जणांनी रक्तसंकलन केले.
या शिबिराचे उदघाटन न. प. अध्यक्ष पीयुष बुरडे यांनी केले. तर प्रमुख पाहुणे म्हणून ठाणेदार किशोर भुजाडे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका अध्यक्ष उमेश काळे, तालुका महीला अध्यक्ष संगीता भलावी, न.प. सदस्य मिलिंद बुरडे, आशिष ढाले, संजय सोनकुसळे, सुनील पाहुणे उपस्थित होते.

शिबिरात जिवन ज्योती ब्लड बॅक नागपूरचे डाॅ अभिजित मानकर, किशोर खोब्रागडे, प्रशांत बारई, पायल सिरसाठ व इतर चमुने रक्त संकलन केले. यशस्वीतेसाठी भुजंग भिंगारे, हेमराज आष्टनकर, देवा मदनकर, प्रशांत बारापात्रे, नरेंद्र आष्टनकर, पुरुषोत्तम नागपुरकर, सुनिल शेंडे, भोजराज बोंदरे, माधुरी भिंगांरे, हेमलता आष्टनकर, वंदना ठमके, इंदु भुसारी, विद्या बडवाईक, शिला उमक, कौस्तूब बडवाईक, निखील केकतपूरे, पवन आष्टणकर, अक्षरा आष्टणकर, भुमीका भिंगारे, रितेश काकडे, अक्षय अंबरते यांनी सहकार्य केले.








